शुक्रवारपासून नाशिकमध्ये महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते उदघाटन

Mahavitaran-Upkendra-Sahaya
महावितरण

नाशिक:महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेला शुक्रवारपासून (१७ नोव्हेंबर) नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. राज्यभरातील जवळपास सहाशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उदघाटन होणार असून स्पर्धेचा समारोप रविवारी (१९ नोव्हेंबर) होईल.State-level sports competition of MSEDCL Nashik on Friday.

खेळ
Sport Image

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळाचे महत्व लक्षात घेऊन महावितरणच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मात्र मध्यंतरी काही काळ या स्पर्धांमध्ये खंड पडला होता. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या प्रोत्साहनातून यावर्षीपासून पुन्हा वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. काही खंडानंतर प्रारंभ होत असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाचा मान नाशिक परिमंडलाला मिळाला असून १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पंचवटीतील आडगाव नाका येथील मातो मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक . संजीव कुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होत आहे. संचालक (संचलन) अभिजीत देशपांडे, संचालक (प्रकल्प) . दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) . सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक . सतीश करपे असतील. मुख्य अभियंता . दीपक कुमठेकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक परिमंडलाने या स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे.

मातो मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, ऍथलेटिक, कुस्ती, कबड्डी, बुद्धीबळ, कॅरम तर एम. जी. रोडवरील मित्र विहार येथे ब्रिज आणि गंगापूर रोडनजीकच्या अप्पर सावरकर नगर येथील सुयोजित वृंदावन व्हॅली मैदानावर क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. मातो मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात रविवारी (१९ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजता स्पर्धेचा समारोप होणार असून संचालक (संचलन) . अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या संघ व खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.