वीज कंपनीचा गलथान कारभार, शेतातला उभा उस जळाला, लाखोंचे नुकसान

सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील डांगसौदाणे शिवारातील दिगंबर बोरसे यांचा  सात एकर, तर वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊस आग लागून खाक झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोघा शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे. sugarcane burning
या घटनेमध्ये, सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावर एस्सार पेट्रोलपंपासमोर दिगंबर बोरसे यांचे व त्यांच्या कुटुंबीयाच्या नावे बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी अनुक्रमे दिगंबर बोरसे यांच्या नावावरील एक हेक्टर, पत्नीच्या नावे असलेले ८६ आर क्षेत्र तर मुलगा योगेश यांच्या नावे एक हेक्टर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात बोरसे यांनी उसाची लागवड केली. काही दिवसात ऊस कारखान्यात गाळपासाठी जाणारा होता. मात्र आता तो आगीत संपूर्णपणे जळाला आहे. सोबतच या उसाला केलेले ठिबक सिंचन ही जळाले आहे. याच क्षेत्रालगत असलेला वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊसही जळाल्याने त्यांचेही चार लाखांचे नुकसान झाले.
बोरसे यांच्या शेतात वीज वितरण कंपनीच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्णपणे लोंबकळल्याने बोरसे यांनी वीज वितरणचे स्थानिक कर्मचारी अणि अधिकाऱ्यांना याची कल्पनाही दिली होती. मात्र स्थानिक अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने सदरचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे. sugarcane burning
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.