येवला: एसटी प्रशासनाचा कारभार, आडमुठ्या धोरणाचा फटका प्रवाश्यांना Yeola News

येवल्याचे एसटी बसस्थानक बनले भकास

भर उन्हाळ्याच्या  तोंडावर येवला स्थानकावरील छत काढून एसटी प्रशासन  प्रवाशांना मरण यातना देत आहे. प्रवासी वर्ग व प्रवाशी संघटनेने  याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. st bus stand yeola people angry upon

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रवाशांना उन्हाच्या तीव्र झळा व तीव्र चटके सोसावे लागत असले तरीही एसटी प्रशासन मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
एसटी  प्रशासनाने  बसस्थानक नूतनीकरणाच्या नावावर सदरशेडचे पत्रे काढून बारा ते पंधरा दिवस उलटले लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध प्रवाशांना भर उन्हात तासन तास चटके सोसावे लागत आहे.

तर मुजोर प्रशासनाला हट्टापाई हे प्रकरण दोन ठेकेदारांच्या भांडणात अडकले असल्याने काम केेंव्हा पूर्ण होईल याबद्दल  प्रवासी वर्ग व नागरिकांकडुन  प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच प्रवाश्यांना बस स्थानकात पिण्याचे  पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पाण्यासाठी तारेवरची कसरतही करावी लागत आहे.अनेकांना पैसे मोजून तहान भागवावी लागत आहे. मात्र  स्थानकातील पाणपोई  शोभेची वस्तू झाली आहे  मात्र निश्चित की अधिकारी प्रशासनाचा कारभार आणि आडमुठ्या धोरणाचा फटका सामान्य माणसाला बसत आहे. हा नक्की.

st bus stand yeola people angry upon

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.