Video : ‘त्या’ आईला अखेर मुलाने स्वीकारले; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा पुढाकार

नाशिक : आपला मुलगा फौजफार असून दुसरा कंडक्टर आहे असे सांगणाऱ्या प्रमिला नाना पवार (वय ६१, रा. नंदुरबार) या वृद्ध महिलेचा एक व्हिडीओ मागील काही दिवसापासून व्हायरल झाला होता. बराच शोध घेतल्यानंतर या मायलेकाची भेट घडवून आणत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आउट ऑफ द बॉक्स कामगिरी केल्याचे कौतुक होताना दिसत आहे. Son accepts mother sensitive story vishwas nangare patil nashik police cp

सविस्तर माहिती अशी की, सकाळ वृत्तपत्राच्या नाशिक आवृत्तीत याबाबतची बातमी बघितल्यानंतर याची गंभीर दखल पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली आणि त्या मुलास शोधण्याचे फर्मान काढले. आपल्या अखत्यारीतील सर्वच पोलीस ठाण्यातील पीएसआयची नवे तपासली असता या वृद्धेचा मुलगा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक म्हणून नोकरीला असल्याचे समजले.

प्रमिला आजी गेल्या अनेक दिवसांपासून जागा मिळेल तिथे राहून वास्तव्य त्या करत होत्या.

गोरक्ष चकणे या तरुणाने एक व्हिडीओ काढून तो सोशल माध्यमातून व्हायरल केला. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे आपली मुलं १४-१५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. आपला मुलगा नाशिक मध्ये फौजदार असून दुसरा मुलगा अक्कलकुवा येथे कंडक्टर आहे.

बातमीची मोठी चर्चा झाल्यानंतर हे वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपावर वस्तू व सेवा कर विभागात नोकरीला लागलेले सतीश नाना पवार यांना जाग आली. गेले दोन दिवस प्रमिला पवार यांचा मुलगा याबाबत पोलीस आयुक्तांना भेटत होता. अखेर आज पोलीस आयुक्तांसमोर आईला पेढा भरवत पंधरा वर्षांनी झालेल्या आईच्या भेटीने आयुक्तांसह उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.

सुना त्रास देतात, नीट सांभाळ करत नाही या कारणाने या वृद्धेने इतरत्र राहण्याचा पर्याय निवडला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सतीश नाना पवार यांच्यासह सून सीमा सतीश पवार यांना समज देत समुपदेशन करत त्यांच्यातील गैरसमज दूर केले.

मुलाने आईला पेढा भरवला. त्यानंतर मुलगा आणि सुनेने आईच्या पालन पोषण करण्यासोबतच आईला कधीही अंतर देणार नसल्याची शपथ घेतली.

यानिमित्ताने गुन्हेगारांना धडकी भरवणारे नांगरे पाटील यांचा संवेदनशील स्वभावाची झलक नाशिककरांना बघायला मिळाली.

Son accepts mother sensitive story vishwas nangare patil nashik police cp
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.