नाशिकच्या जवानाची गळफास घेवून आत्महत्या, घरातील वाद कारणीभूत

नाशिकचे चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्यदलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांनी घरघुती कारणातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी अर्जुन कामाला होता, त्या ठिकाणच्या झाडाला गळफास घेवून त्याने आत्महत्या केली आहे. ही घटना घडणाया आगोदर त्याचे त्याच्या बायको सोबत जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे तिला परत तिच्या भावासोबत पाठवण्यात आले होते.

या आगोदारची बातमी खालील प्रमाणे होती. मात्र ती प्रसिद्ध केल्या नंतर उशिरा याबद्दल पूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. लष्कराचे दोन जवान शहीद झाल्याने हा गोंधळ माध्यमातून निर्माण झाला. अनेक आघाडीच्या वृत्तवाहिनी आणि वृत्त पत्रांनी त्याच्या वीरमरणाची बातमी दिली, सोबतच आम्ही सुद्धा प्रसिद्ध केली त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

 त्यांचे पार्थिव उद्या मुंबई मार्गे ओझर विमानतळ ते त्यांच्या मूळ गावी चांदवड मार्गे येणार आहे. तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार मंगळवारी दिनांक २२ रोजी गावी भरवीर येथे होणार आहे. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.soldier of maharashtra

रविवारी भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी पाकड्कयाडून होत असते मात्र  पाकड्याच्या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई केली तर आपल्या लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

आपल्या लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये घुसून कारवाई सुरू केली असून, जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. सोबतच तोफांचा जबरदस्त  मारा केला आहे.

त्यामुळे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. प्रत्युत्तरा दाखल भारताने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या 35 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये शनिवारी रात्री कारवाईत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. soldier of maharashtra

मतदानाच्या दिवशी हे ओळखपत्र जवळ ठेवा : बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारताच्या जोरदार कारवाईत पाकिस्तानचे सहा सैनिक ठार झाले आहे. सोबतच 35 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. भारताच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक लाँच पॅड उद्ध्वस्त झाले आहेत.

चांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन वाळुंज हा सध्या अरुणाचल प्रदेश मध्ये कार्यरत होता. सदर जवान 2010 साली सोल्जर म्हणून मराठा रेजिमेंट मध्ये दाखल झाले होते. सदर जवान शहीद झाल्याच्या वृत्त समजताच सोशल मिडीया आणि माध्यमात बातमी पसरली होती, मात्र आर्मीने याबद्दल उशिरा स्पष्टीकरण दिले आणि अर्जुन ने आत्महत्या हे स्पष्ट झाले.  भरवीर गावासह चांदवड तालुक्यासह जिल्ह्यावर  शोककळा पसरली आहे.soldier of maharashtra

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.