स्मार्ट रोड, सायकल शेअरिंगला मान्यता; यशवंत मंडईत बहुमजली पार्किंग

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक शहरातील अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्ट रोड विकसित करण्याच्या पथदर्शी प्रकल्पाच्या १४.५३ कोटींच्या निविदांना नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी(दि११) अंतिम मान्यता देण्यात आली. smart city nashik smart road cycle sharing multi level parking

smart city nashik smart road cycle sharing multi level parking, स्मार्ट रोड, सायकल शेअरिंगला मान्यता; यशवंत मंडईत बहुमजली पार्किंग Smart Nashik Nashik municipal smart city development corporation limited ashok stamb to tryambak naka smart road nashik cyclists flora foundation

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड ची सातवी बैठक बुधवारी (दि. ११) पार पडली त्यात काही निर्णय घेण्यात आले. कंपनीचे पदसिद्ध संचालक महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, तसेच आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त स्वतंत्र संचालक भास्कर मुंढे, तुषार पगार, तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थविल या बैठकीस उपस्थित होते. smart city nashik smart road cycle sharing multi level parking

सायकल शेअरिंग उपक्रम घेणार आकार

स्मार्ट सिटी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सायकल शेअरिंगच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी फ्लोरा फाउंडेशन या संस्थेच्या नियुक्तीवर संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या संस्थेमार्फत शहरातील १७ ठिकाणी सायकल शेअरिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या तीन महिन्यांत तब्बल एक हजार सायकल उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर महापालिका मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापासून उपक्रम सुरु होणार आहे. smart city nashik smart road cycle sharing multi level parking

असा असेल नाशिक शहरातील पहिला स्मार्ट रोड

स्मार्ट पार्किंगलाही मान्यता

शहरात २८ ठिकाणी ऑन रोड पार्किंग तर पाच ठिकाणी ऑफ रोड पार्किंग असणार आहे. ‘पे आणि पार्क’ असे त्याचे स्वरूप असणार आहे. यांसह पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत बहुमजली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यशवंत मंडई येथे २१२ तर सीतागुंफा येथील जागेत २५२ चारचाकींची पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या निविदा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. smart city nashik smart road cycle sharing multi level parking

तसेच शिवाजी स्टेडीयम येथेही कार पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव आहे. भूमिगत पार्किंग याठिकाणी उभारण्यात येणार आहे.

smart city nashik smart road cycle sharing multi level parking

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “स्मार्ट रोड, सायकल शेअरिंगला मान्यता; यशवंत मंडईत बहुमजली पार्किंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.