बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांची भूमिका महत्वाची–अनंत गीते

आपल्या समोर सध्या बेरोजगारी ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.यावर जर मात करायची असेल तर यामध्ये रोजगार मिळवणून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे यासर्व  उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रलयाल प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री यांनी केले आहे. नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे मेक इन नाशिकअंतर्गत गेटवे होटेल अंबड येथे वेंडर डेव्हलपमेंट शिबिराचे अनंत गिते यांच्या हस्ते सोमवारी (दि.30) उद्घाटन करण्यात आले आहे.

आपल्या देशात मेक इन इंडियाची ताकत वाढवण्यासाठी आपण मेक इन नाशिकची निर्मिती केली आहे. त्यामुळे औद्योगिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी मेक इन नाशिकची महत्वाची भूमिका ठरणार आहे. जर देशाचा विकास गरजेचा असेल तर इतर मोठ्या उद्योगांसोबरोबरच स्मॉल स्केल अर्थात  लघु आणि  मध्यम स्वरुपाच्या उद्योगांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात आपल्या  देशाचे अर्थकारण अवलंबून आहे असे गीते यांनी सागितले आहे.

तर स्पर्धात्मक वाढ ही औद्योगिक विकासाला पोषक आहे त्यामुळे गुणात्मक स्पर्धा झालीच पाहिजे  आहे. भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (बीएचईएल) ला तोट्यातून बाहेर काढण्यात सरकारला यश आले आहे. उद्योगक्षेत्रच्या विकासासाठी मेक इन इंडिया अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे गिते यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मधुकर ब्राम्हणकर, हरिशंकर बनर्जी रामाशिष भूतडा आदि उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.