बहिणीने काढला भावाचा काटा नाशिक रोड खून प्रकरण

बहिणीने काढला भावाचा काटा
नाशिक :नाशिक रोड परिसरात डोक्यात दगड घालून हत्या झालेल्या संतोष पाटील यांच्या हत्येचं गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे संतोषच्या सख्ख्या बहीण आणि आईनेच हा कट रचल्याचं माहिती आहे.संपत्तीच्या हव्यासातूनच मायलेकींनी आपल्या भावाला संपवलं आहे हे समोर आले आहे . मावस भावाच्या मदतीने दोघांना 40 हजार रुपयांची सुपारी त्यांनी दिली होती. यासाठी बहिणीने आईलाही फुस लावल्याचं तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी जेलरोड परिसरातून अटक केली आहे.यामध्ये बहिण मनीषा विनायक पवार यांनी मावस भाऊ  गणेश ढमाले,संजय पाटील,सुधीर खरात जेलरोड यांना सुपारी देवून संतोष पाटील याचा खून केला आहे.7 मार्चला रात्री संतोष पाटीलची नाशिकरोड परिसरातील दसक येथे गळा आवळून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी ताब्यात घेतले आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *