सिन्नर : रिक्षा – ट्रकच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू

Sinner aadva phata Accident Woman dies fire burn

सिन्नरमधील आडवा फाटा येथे शनिवारी (दि. 14) सायंकाळी झालेल्या अपघातानंतर रिक्षाला लागलेल्या आगीत रिक्षातील तीन प्रवासी आगीत होरपळले असून त्यातील वृध्द महिलेचा आज (दि. 15) उपचारादरम्यान नाशिक येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

घडलेली घटना अशी की, सिन्नर शहरातील आडवा फाटा येथे शनिवारी सायंकाळी आयशर ट्रकने रिक्षा आणि दुचाकीला मागून धडक दिली. सुरुवातीला हा अपघात सामान्य वाटत होता. तेथे उपस्थित तरुणांनी लगेचच अपघातस्थळी धाव घेतली. मात्र रिक्षा पाठीमागून दाबली गेल्याने इंधन टाकीतील इंधन पेटून अचानक अपघातग्रस्त रिक्षाने पेट घेतला.

रिक्षातील प्रवासी रिक्षात अडकून पडले. ट्रक मागे घेऊन किंवा रिक्षा पुढे ओढूनही असलेल्या प्रवाश्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. आग लागून प्रवासी होरपळत होते. तेथे बचावकार्य करणाऱ्यांनी बादलीने पाणी आणून टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. अखेर जवळील पेट्रोल पंपावरील गॅस नळी आणत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मात्र तोपर्यंत उशीरच झाला होता असे म्हणावे लागेल. रिक्षातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नाशिकला हलविण्यात आले.

यात वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला असून रिक्षाचालकासह इतर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sinner aadva phata Accident Woman dies fire burn

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.