‘पाणी फाऊंडेशन’च्या स्पर्धेत आता सिन्नर आणि चांदवड येथील गावे

७५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस

नाशिक : अभिनेता आमीर खान यांच्या ‘पाणी फाऊंडेशन’ च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणी टंचाईचा सामना करणा-या चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड झाली आहे. तर या स्पर्धेसाठी  राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘वॉटर कप’स्पर्धा ‘पाणी फाऊंडेशन’ घेणार असून चांदवड , सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ग्रामपंचायत जवळपास ७५ लाखाचे बक्षिस जिंकता येणार आहे.

मुख्यमंत्री आणि आमीर खान

‘पाणी फाऊंडेशन’ च्या वतीने मागील  दोन वर्षापासून राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे कामे केली जात आहेत. मात्र यावेळी पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणा-या राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला महत्व दिले जाणार आहे.

या साठी नाशिक येथील चांदवड व सिन्नर हे दोन तालुके निवडले आहेत. दोन्ही तालुक्यातील  गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी नोंदवणार आहे. सहभागी होऊ इच्छिणा-या ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करायचा असून  पाणी फाऊंडेशनला प्रस्ताव द्यायचा आहे. ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावे द्यायची आहेत. या नागरिकांना फाऊंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यामध्ये ८ एप्रिल २०१८ ते  ते २२ मे २०१८  या ४५ दिवसाच्या कालावधीत स्पर्धेत सहभाग नोंदवत असलेल्या ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे पूर्ण करणार आहेत.ही सर्व कामे शासनाची मदत घेत लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन ही कामे पुर्ण करावी लागणार आहे. या स्पर्धेत राज्यात प्रथम येत असेलल्या तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखाचे पारितोषित घोषित केली आहेत. पहिल्या येत असलेल्या  ग्रामपंचायतीला १० लाख बक्षिस दिले आहेत.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.