श्रिया ,भैरवी ने जिंकली सौदर्य स्पर्धा ; Miss Teen Universe,Miss Global International 2017

नाशिकची कन्या असलेली श्रिया तोरणे आणि भैरवी बुरड  यांनी प्रतिष्ठीत अशी  Abraxas Goddess of Beauty 2017 आयोजित सौदर्य स्पर्धा वेगवेगळ्या गटात सौदर्य मुकुट जिंकले   आहेत. यामध्ये श्रिया तोरण यांनी Miss Teen Universe India 2017  हा किताब आणि मुकुट जिंकला  आहे.  तर भैरवी बुरड  यांनी Miss Global International India 2017 हा किताब आणि मुकुट जिंकला आहे. त्यामुळे नाशिकच्या  सौदर्यात  दोन मानाचे तुरे  रोवले गेले आहे. ही भारतीय स्तरावरील स्पर्धा होती. ही स्पर्धा दिल्ली येथे संपन्न झाली आहे. स्पर्धेतील दोन गटात भाग घेतला  होता यामध्ये श्रिया ही टीन अर्थात किशोरवनीय गटात तर भैरवी ही युवती अर्थात मोठ्या गटात जिंकली   आहे. नाशिकच्या मुलींची ही देश पातळीवर मोठी भरारी आहे.

श्रिया स्वप्नील तोरणे ने  Abraxas Goddess of Beauty 2017 आयोजित सौदर्य स्पर्धा  Miss Teen Universe India 2017  हा किताब आणि मुकुट जिंकला  आहे. ही  स्पर्धा हॉटेल उमराव दिल्ली येथे संपन्न झाली आहे. या स्पर्धेत श्रिया ने Miss Beautiful Eyes अर्थात सुंदर नयन असलेली स्पर्धक असा किताब सुद्धा मिळवला आहे. तर सोबतच तिचा ‘Best in Party Wear by I Love Kapda’  हा सुद्धा किताब दिला आहे.

भैरवी प्रदीप  बुरड  यांनी प्रतिष्ठीत अशी  Abraxas Goddess of Beauty 2017 आयोजित सौदर्य Miss Global International India 2017 हा किताब आणि मुकुट जिंकला आहे. यामध्ये  त्यांनी अनेक किताब सुद्धा जिंकले आहेत.   भैरवी ने या स्पर्धेत  Miss Congeniality अशी निवड तिच्या सोबतच्या स्पर्धकांनी तिची केलेली आहे. यामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व    जीमैका कॅरिबियनमधील  होत असलेल्या  जागतिक स्पर्धा  Miss Global International 2017  या स्पर्धेत  करणार आहेत.

या दोघींच्या विजयामुळे नाशिकच्या गणपती सणातील आनंदात आणखीन भर पडणार आहे. या दोघीही दिल्ली येथे असून त्या लवकरच नाशिकला येणार आहेत. या स्पर्धेसाठी दोघींनी अथक मेहनत घेतली होती. व्यायाम ते डाएट सर्व प्रकरणावर त्यांनी नियंत्रण ठेवत कसून तयारी केली आहे. दोघींचे वय पाहता त्या जागतिक होत असलेल्या अनेक स्पर्थेत नक्कीच यश संपादन करतील.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.