नाशकात राजकीय भूकंप – शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्र

Shivsena Resignation Nashik West

नाशिक शहरात राजकीय भूकंप घडला असून शिवसेनेच्या सर्व ३६ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. २१ ऑक्टोबरला मतदान असलेल्या महराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडवा अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या नाशिकमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र भाजपसह केलेल्या युतीत नाशिक शहरातील एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. त्यामुळे शिवसेना बंडखोरांच्या वतीने विलास शिंदे नाशिक पश्चिममधून उमेदवारी करत आहेत.

नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे 21 नगरसेवक असलेल्या या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत.

यापुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचं सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नाशिकमध्ये सोमवारी (दि. 14) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. या सभेवर उघडपणे बहिष्कार टाकत शिवसेने भाजपला झटका दिला.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून येत असलेल्या दबावापुढेही न झुकण्याचा निर्णय शहरातील पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.

खुद्द पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्यात प्रचारसभा घेण्यासाठी आले असता नांदगावमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उतरण्यावर चाकर शब्दही बोलले नाही. तसेच नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांशी न बोलता दोन दिवसांनी मुंबईत बोलावले. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नसल्याचे नाशकातील नेत्यांच्या आजच्या निर्णयातून दिसून येते. Shivsena Resignation Nashik West

दुसरीकडे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क सुरू केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.