नाशिकमध्ये १५ पैकी ७ पंचायत समितीवर शिवसेना

नाशिकमध्ये १५ पैकी ७ पंचायत समितीवर शिवसेना
नाशिक : नाशिक जिल्ह्यात १५ पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपने इतर पक्षांसोबत घरोबा करत एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यात १५ पैकी ७ पंचायत समितींवर शिवसेनेचे सभापती निवडून आले आहे. नाशिक तालुका वगळता इतर तालुक्यांत मात्र सेना-भाजप एकमेकांना सत्तेपासून दूर राखण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी दोन्ही पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच अपक्षसोबत हातमिळवणी केली. मालेगाव तालुक्यात शिवसेना मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी आणि अपक्षांची साथ घेतलीचांदवड तालुक्यातदेखील भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता मिळवली आहे. दिंडोरी आणि देवळा तालुक्यातच भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीची मदत घेत या दोन पंचायत समितींवर सत्ता काबीज केली आहे.  
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.