पुन्हा युतीचे चिन्ह, उद्धव ठाकरे यांनी दिले नाशिकमध्ये संकेत, चंद्रकांत पाटील -ठाकरे एकत्र प्रवास

नाशिक : चांगल्या कामात खोडा घालण्याचे पाप मी कधी केले नाही.पण पटेले  नाही त्यावर जनतेसाठी शासनाच्या विरोध सत्तेत राहुत  आसुड ओढले आहेत. त्यामुळेच राममंदीराचा प्रश्न मी हाती घेतलाय.शेतकरी होरपळत असतांना दुष्काल सदृश्य स्थिती असतांना व क़र्ज़ माफ़ी त अपात्रतेचा घोळ  सुरू आहे. शेतकऱ्याना खरंच क़र्ज़माफ़ीचा लाभ झाला का ? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यासह भाजपा-सेनेच्या मंत्र्याना विचारला आहे. नियमितपणे पंतप्रधान मोदीसह भाजपा सरकारवर तोफ डागणारे ठाकरे यांनी आज दिवालीच्या तोंडावर फटाके न फोडता थोडी मवाळ भूमिका घेतली आहे. जर कोणी चांगले काम करत असेल तर शिवसेना जनतेच्या हितासाठी त्यांच्या सोबत आहे असे सुतोवाच देखील उद्धव ठाकरे यांनी केले. निफाड येथे शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या विकासकामांचं आज नाशिकमध्ये उद्घाटन होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंसह चंद्रकांत पाटील यांनाही आमंत्रण देण्यात आलं होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी  मागील काही दिवसांत शिवसेना – भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावा विषयी भाष्य केले. उद्धव म्हणाले की, आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात, लवकरच आपण राम मंदिराच्या भूमीपूजनाला एकत्र जाऊया, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुका जवळ येत आहेत हे पाहून उद्धव ठाकरेंनी समोपचाराची भाषा सुरू केल्याची चर्चा आहे.

यावेळी उद्धव यांनी कर्जमाफी आणि दुष्काळाच्या निर्णयांचा फेरआढावा घेण्याची मागणीही चंद्रकांत पाटील यांना केली आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला हेदेखील पुन्हा सरकारने बघायला पाहिजे असे त्यांनी सागितले. कर्जमाफी मिळवताना शेतकऱ्यांना येणाऱ्या पात्र, अपात्रेतच्या अडचणींकडेही लक्ष पुरवले पाहिजे. सरकारने मोठ्या योजना जरूर जाहीर कराव्यात. मात्र, त्या पूर्ण होण्याचा कालावधीही निश्चित केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

ठाकरे – पाटील सोबत प्रवास

आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, असा पुनरुच्चार शिवसेनेकडून वारंवार होत असला तरी आज  वेगळंच चित्र होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला तर त्यांच्या सोबत  यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकरही होते.नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या प्रवासाला सुरुवात झाली का? अशी जोरदार चर्चा  होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.