शिवसेना अंतर्गत भडका आणि महानगर प्रमुखाला मारहाण

शिवसेना अंतर्गत भडका आणि महानगर प्रमुखाला मारहाण

भाजपात एका बाजूला गोधळ सुरु असताना शिवसेनेत मात्र परिवार वाद सुरु झाला होता. चांडक सर्कल परिसरात एका हॉटेल मध्ये अधिकृत फॉर्म दिले जात होते. यावेळी माजी महापौर विनायक पांडे यांनी आपल्या मुलाला अधिकृत उमेदवारी द्या अशी गळ घातली. मात्र एका घरात किती तिकिटे देणार असे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. याचवेळी दोघांचा पारा चढला आणि हॉटेल लॉबीत जोरदार दोघात झोंबाझोंबी झाली. हा प्रकार लक्षात येताच दोघांचे समर्थक आले आणि एकमेकांना भिडले होते. हॉटेलमध्येच कुस्तीचा आखाडा रंगला होता. बोरस्ते यांना मारहाण करत शिवीगाळ केली आहे. विनायक पांडे यांच्या घरात त्यांना, त्यांच्या भाऊजई तिकीट हवे  होते. मात्र त्यात मुलाला टीकीट नाकारले म्हणून हा सर्व प्रकार घडला होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.