शिवकार्य गडकोट संस्था : २३ एप्रिल रोजी किल्ले हातगडवर श्रमदान मोहीम

शिवकार्य गडकोटची येत्या २३ एप्रिल रोजी किल्ले हातगडवर श्रमदान मोहीम

नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ४७ वी गडकोट संवर्धन श्रमदान मोहीम किल्ले हातगड वर येत्या रविवार २३ एप्रिल २०१७ रोजी होणार आहे.

सह्याद्रीच्या उपरांगेत सातमाळा पर्वत रांगेच्या प्रारंभी असलेल्या किल्ले हातगड मोहिमेत किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू,शिलालेख व वस्तूंचा अभ्यास, मोजमाप व पाहणी केली जाणार आहे. तसेच किल्ल्यावरील बुजलेले शिवकालीन टाके, तळे यांच्यातील गाळ, माती, मुरूम, दगडे अभ्यासपूर्ण पध्दतिने काढण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रवासखर्च, डोक्यात टोपी, पायात ट्रेक शूज, जेवणाचा डबा, पिण्यासाठी पाणी घ्यावे घेण्याच्या सूचना आयोजकांनी केल्या आहेत.

या मोहिमेत नावे नोंदण्यासाठी मोहिमेचे मुख्य संयोजक योगेश कापसे मो.९८५०४९०७९० या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “शिवकार्य गडकोट संस्था : २३ एप्रिल रोजी किल्ले हातगडवर श्रमदान मोहीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.