शिवकार्य गडकोटची ५३ वी मोहीम उत्साहात : किल्ले मालेगाव भुईकोटवर स्वच्छता

नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ५३ वी किल्ले श्रमदान मोहिंम मालेगाव भुईकोट किल्ला व चांदवड़ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रंगमहालला भेट देऊन पार पडली. यावेळी उपस्थित गडकोट संवर्धकानी किल्ले मालेगाव भुईकोट येथील आतील भागात स्वच्छता मोहिंम राबवीली गेली. दुर्गआभ्यासक प्रा. सलीम पिंजारी यांनी सर्व दुर्ग संवर्धकांना किल्ल्याची इतंभूत माहिती दिली.

यंदाच्या या ५३ व्या मोहिमेला श्रमदान मोहिमेसह दुर्गदर्शनाची साथ मिळाली. पहाटे 6 वाजता नाशिकच्या छत्रपति शिवरायांच्या पुतळयापासून झाली. प्रथम चांदवड येथील होळकर घराण्याचा रंगमहाल येथे भेट दिली. रंगमहालाचे संवर्धन कार्य जोमात सुरु असल्याचे यावेळी दिसून आले. तेथून पुढे होळकर घराण्याने बांधलेल्या किल्ले चंद्राईवरील चंद्रेश्वर हे प्राचीन देवस्थान व पायथ्याशी असलेल्या प्राचीन रेणुका मातेचे मंदिर आहे. तेथे दर्शन घेण्यात आले.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था भुईकोट मालेगाव रंगमहाल चांदवड नाशिक जिल्हा किल्ले shivkarya gadkot kille bhuikot malegaon rangmahal chandvad

 

मालेगाव येथील मौसम नदीवर वसलेल्या भव्य अशा भुईकोट किल्ल्याला भेट देण्यात आली. यावेळी प्रा. सलीम पिंजारी यांनी किल्ल्याची माहिती दिली, ई.स.१७४० मधे हा भुईकोट किल्ला नारोशंकर यानी बांधला. पेशव्यांकड़ून परवानगी घेवून इथे वाड़ा ही बांधण्यात आला. हे बांधकाम उत्तर भारतातून आलेल्या कुशल कारागिरानी केले आसल्याचा उल्लेख आढळतो. भक्कम तटबंदी, खंदक त्याठिकाणी वाढलेली वस्ती बघता एकूणच किल्ल्याची भव्यता लक्षात येते.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था भुईकोट मालेगाव रंगमहाल चांदवड नाशिक जिल्हा किल्ले shivkarya gadkot kille bhuikot malegaon rangmahal chandvad

या नंतर कौळाणे या गावातील महाराज सयाजीराव गायकवाड़ यांचा सुस्थितितिल वाडा गड़संवर्धक यांनी बघितला. यावेळी जेष्ठ दुर्गसंवर्धक रतन भावसार यानी सयाजी राजे यांच्या कारकीर्द सांगितली. या मोहिमेत संस्थेचे निमंत्रक प्रा.सोमनाथ मुठाळ, जेष्ठ सल्लागार संदीप भानोसे, आर. आर .कुलकर्णी, इतिहास वस्तु संग्राहक कचरू वैद्य, गजानन दिपके, संतोष इटनारे, रतन भावसार, सल्लागार शाम कुलथे, सांस्कृतिक प्रमुख गणेश सोनवणे, डॉ. भरत ब्राह्मने, श्रमदान समितीचे राहुल भोसले, नितिन देशपांडे, हर्षल गायकवाड़, अशोक कुंडरे, निलेश ठुबे, संकेत भानोसे, कु.तनिष्का ब्राह्मने, रेणुताई भानोसे, सार्थक जाधव, ओंकार मुठाळ, सागर बोडके, वनिता इटनारे, दीप्ति देशपांडे, अनूप गायकवाड़, भैरवी तिपायले, नितिन देशपांडे, कावेरी इटनारे, सुमेध इटनारे यासह अनेक गडकोट संवर्धक उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.