खडक माळेगाव गणात 2 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी : शिवा पाटील सुराशे

Share this with your friends and family

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : निफाड पंचायत समितीच्या खडक माळेगाव गणात दोन कोटी रुपयांच्या  विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती  पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे यांनी दिली. shiva patil surashe development work approval two crore khadak malegaon

खडक माळेगाव गणातत आठ गावांचा समावेश असून या सर्व  गावांकरिता विविध विकासकामांसाठी निधी शिवा सुराशे यांनी मंजूर करून आणला आहे. अल्पसंख्यांक विभागातर्फे खडक माळेगाव येथे नमाजपठण शेड करणे करिता दहा लक्ष रुपये, पाण्याची टाकी बांधणे पाच लक्ष रुपये, पेवर ब्लॉक बसविणे पाच लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

टाकळी विंचुर दफनभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे पाच लक्ष रुपये, नमाज शेड बांधणे 5 लक्ष रुपये, इदगाह परीसरात पेव्हर ब्लॉक बसविणे दहा लक्ष रुपये, नागरी सुविधा योजने अंतर्गत टाकळी हद्दीतील सरस्वती नगर मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे दहा लक्ष रुपये, खडक माळेगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करने दहा लक्ष रुपये, कोटमगाव येथे तीर्थस्थळ योजनेअंतर्गत रोकडेश्वर मंदीर परिसरात वाहनतळ बांधणे दहा लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. shiva patil surashe development work approval two crore khadak malegaon

खडक माळेगाव येथे हरीबाबा मंदिर परिसरात भक्तनिवास बांधणे दहा लक्ष रुपये, कोटमगाव येथे दलित वस्ती योजना अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष रुपये, थेटाळे परिसरात पाणीपुरवठा पाईपलाईन करने साडेचार लाख रुपये, खडक माळेगाव हद्दीतील चांभार वाडा परिसरात हायमास्ट बसविणे पाच लक्ष रुपये, याच परिसरातील सुलभ शौचालय बांधणे 5 लक्ष रुपये, राजवाडा परिसरात सुलभ शौचालय बांधण्यास 5 लक्ष रुपये, राजवाडा परिसरात सभागृह मंडप उभारणे पाच लाख रुपये, याच परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करणे पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

खानगाव नजीक येथे भूमिगत गटार बांधणे 2.80 लक्ष रुपये, वनसगाव येथील चर्मकार वस्ती येथे हायमास्ट लावणे सहा लक्ष रुपये, मातंग वस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे चार लक्ष रुपये, सारोळे खुर्द हद्दीतील राजवाडा परिसरात कॉंक्रीट रस्ता करणे 8 लक्ष रुपये , राजवाडा परिसरात सभामंडप उभारणे 7 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. shiva patil surashe development work approval two crore khadak malegaon

ब्राम्हणगाव वनस हद्दीतील राजवाडा परिसरात सुलभ शौचालय बांधणे 5 लक्ष रुपये, महिला शौचालय याकरिता 5 लक्ष रुपये, टाकळी  विंचुर येथे नवीन पाईप लाईन करणे पाच लक्ष रुपये, जलयुक्‍त शिवार योजनेअंतर्गत बंधारे दुरुस्त काम करणे करिता 18 लक्ष रुपये, टाकळी विंचुर येथे जन सुविधा योजने अंतर्गत निवारा शेड बांधणे 10 लक्ष रुपये, खडक माळेगाव ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 12 लक्ष रुपये, ब्राम्हणगाव वनस व कोटमगाव येथे प्रत्येकी  स्मशानभूमी अंतर्गत अनुषंगिक कामे करणे याकरिता पाच लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

हे विकासकामे मंजुरीसाठी अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार अनिल पाटील कदम यांचे सहकार्य मिळाले असल्याचे शिवा पाटील सुरासे यांनी सांगितले.

shiva patil surashe development work approval two crore khadak malegaon

मित्रानो आपला Whats App ग्रुप आहे आमचे 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव हवे असतील तर आपल्या ग्रुप मध्ये आमचे क्रमांक जोडून घ्या !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.