शिल्पी अवस्थी मिसेस इंडिया इंटरनॅशनल किताबाच्या मानकरी

नाशिक : नाशिक जसे सायकल हब, वाईन सिटी म्हणून पूर्ण देश आणि जगात उद्ययास येेेत आहे तसेच नाशिकच्या कन्या त्यांच्या सौदर्य आणि बुद्धीच्या बळावर देशासह जगात नाव मिळवत आहे. यामध्ये अजुन एका सौदर्य किताबाची भर पडली आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे नुकतीच पार पडलेली मिसेस इंडिया इंटरनॅशनल ही सौंदर्य स्पर्धा नाशिकच्या शिल्पी अवस्थी यांनी जिंकली आहे. त्यांना हा किताब बहाल करण्यात आला आहे. शिल्पी या २०१७ -१८ या सालातील विजेत्या ठरल्या. यामध्ये आपल्या देशातून बौद्धिक आणि सौंदर्याच्या आधारावर निवड झालेल्या ३० सौंदर्यवतीतून शिल्पी यांनी हा बहुमान मिळवला आहे.

शिल्पी नाशिकमधील व्यावसायिक महिला आहेत. तर त्या सामाजिक कार्यातही योगदान देतात. यामध्ये फक्त सौंदर्य स्पर्धा नव्हती तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व कसे आहे याचीही चाचणयामध्ये घेण्यात आली आहे. स्पर्धेत सामान्यज्ञान, टॅलेंट राउंड, थिम राउंड अशा विविध चाचण्यांतून ही निवड करण्यात आली. या आगोदर नाशिकच्या कन्यांनी सौंदर्य आणि बौद्धिक बळावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. नाशिकच्या पोरी आहेतच भारी असे म्हटलेच जाते. त्यास आठवड्यातून एक अशी बातमी येऊन धडकत आणि त्यास दुजोराच मिळतो आहे. त्यांचे अभिनंदन.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.