शेतकरी सुकाणू समितीकडून ‘अन्नत्याग आंदोलन’  

नाशिक : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामुहिक आत्महत्या १९ मार्च १९८६ रोजी केली होती. राज्यातील पहिली आत्महत्या म्हणून याकडे पाहिले जाते. या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले. shetkari sukanu samiti done agitation remember first farmer suicide nashik

शेतकरी सुकाणू समितीने सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, दीडपट हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी आत्महत्येस जबाबदार सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी केली.

अन्नत्याग आंदोलनाचा समारोपात जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन संस्था पुन्हा उभारण्यासाठी राज्य सरकारने २५ कोटीचे अनुदान दिले त्याच धर्तीवर जिल्ह्यातील संस्थांचे कर्ज मुक्त करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, वृद्धापकाळात शेतक-यांना पेन्शन द्या, चांदवड,  निफाड येथील द्राक्ष उत्पादकांना बुडविणा-या व्यापा-यांचा शोध घ्यावा आदी मागण्याही करण्यात आल्या.

shetkari sukanu samiti done agitation remember first farmer suicide nashik

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.