शेतकरी न्यायासाठी संघर्ष यात्रा सुरुच ठेवाणार – शरद पवार

Share this with your friends and family
शेतकरी न्यायासाठी संघर्ष यात्रा सुरुच ठेवाणार – शरद पवार
नाशिक : लोकामध्ये शेतकरी कर्जमाफी आय विषयावर एकमत होतोय तर त्यामुळे संघर्ष यात्रा फार मोठी गरज असून त्या साठी शेतकरी न्यायासाठी संघर्ष यात्रा सुरुच ठेवाणार असल्याचे मत शरद पवार आयांनी व्यक्त केले.मुरबाड येथील कार्यकर्ता मेळावा आटोपून पवार आज नाशिकमध्ये हॉटेल एमराल्ड पार्क येथे मुक्कामासाठी थांबले असताना पत्रकारांशी बोलत होते.कर्जमाफीसाठी सरकारविरोधात संघर्ष यात्रा काढण्यात आली असून तिचा समारोप पनवेल येथे होईल. या समारोप कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहणार आहोत, असे राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा असून त्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीसाठी ठिकठिकाणी आग्रह होत आहे. त्यामुळे या मुद्यावर जनजागृती करण्याची गरज होती.शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी सत्ताधारी शिवसेना पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे दिसत आहे. आगामी काळात सोबत राहणार का? असे पवार यांना विचारले असता सेना अजून यात्रेत सहभागी झालेली नाही. निवडणुकांना अद्याप अवकाश आहे; परंतु शिवसेनासोबत आल्यास त्यांचे स्वागतच असेल, असे पवार यांनी यावेळी सांगितले. शरद पवार आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, नाना महाले यांनी त्यांचे स्वागत केले.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.