Property expo ‘शेल्टर – २०१९’ गृह्प्रदर्शन १९ ते २२ डिसेंबर दरम्यान

नाशिक ब्रॅण्डिंग व शहराच्या अर्थकारणास चालना देणा-या क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘शेल्टर’ – २०१९ हे प्रॉपर्टी प्रदर्शन येत्या १९ ते २२ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर होत असून या प्रदर्शनाची घोषणा हॉटेल गेटवे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  एका कार्यक्रमात करण्यात आली.property expo

 या प्रसंगी खा. हेमंत गोडसे,आ. सौ. सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, आ. राहुल आहेर, उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती अध्यक्ष उद्धव निमसे, व जे. एल. एल. या आंतरराष्ट्रीय प्रॉपर्टी सल्लागार संस्थेचे विभागीय व्यवस्थापकिय  संचालक करण सोधी हे मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात बोलताना खा.हेमंत गोडसे म्हणाले की नाशिक ची कनेक्टिव्हिटी बरीच वाढली असून येत्या काही वर्षात त्यात अजून भर पडणार आहे .नवीन विमान मार्ग ,नाशिक पुणे रेल्वे यामुळे देखील अनेक सकारात्मक बदल होतील .बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी देखील  नेहमीच सहकार्य  असल्याचेही त्यांनी नमूद केले .

 हे प्रदर्शन फक्त क्रेडाईचे नसून पूर्ण नाशिक शहराचे असल्याचे सांगत  शहर विकास व  ब्रॅण्डिंगसाठी क्रेडाईच्या प्रयत्नांची प्रशंसा केली व अधिकाधिक संख्येने प्रदर्शनास सहभागी होण्याचे आवाहनही  आ.सीमा हिरे व आ राहुल आहेर यांनी आपल्या मनोगतात केले .

 यानंतर आपल्या प्रास्ताविकात बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे म्हणाले की, दर दोन वर्षांनी होणारे शेल्टर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृह्प्रदर्शन असून यामध्ये प्लॅट्स, प्लॉटस, शेत जमीन, फॉर्म हाउस, शॉप, ऑफिसेस, बांधकाम साहित्य, गृहवित्त सहाय्य करणा-या संस्था यांचे स्टॉल्स एकाच  छताखाली असणार आहेत. त्यांच्यातर्फे विविध ऑफर्स देखील देण्यात येणार आहेत. त्यामुळे गृह्स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी ही एक मोठी पर्वणी असल्याचेही ते म्हणाले.

Shelter - 2019  the biggest property expo of North Maharashtra  from 19 to 22  December
माहिती पत्रकाचे अनावरण

शेल्टर मधील उलाढालीमुळे शहराच्या विकासामध्ये तथा अर्थकारणामध्ये सकारात्मक बदल होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये अनेक बदल झाले असून उत्तम हवामानामुळे नाशिक हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. त्यातच हवाई वाहतुकीच्या उपलब्धतेमुळे जगासोबत संपर्क देखील वाढत आहे. नाशिक मध्ये घर घेण्यासाठी नाशिककरांसोबतच मुंबई, पुणे, सुरत तसेच उत्तर महाराष्ट्र यामधील निवासी नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्यासाठी देखील बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांना एकाच ठिकाणी भेटण्याची संधी शेल्टर निमित्ताने मिळणार आहे.

शेल्टर २०१९ चे समन्वयक रवी महाजन व सह्समन्वयक कृणाल पाटील यांनी शेल्टरचे सादरीकरण करून शेल्टरचा ले आउट खुला केला. ते म्हणाले की या वेळेसचे शेल्टर “वॉव नाशिक, नाऊ नाशिक” या संकल्पनेवर आधारित असून सद्यस्थितीमधील नाशिक व भविष्यातील नाशिक कसे असेल यावर एक गॅलरी प्रदर्शनात राहणार आहे. याशिवाय नागरिकांसाठी प्रॉपर्टी विषयी अनेक माहितीपर सेमिनारचे देखील आयोजन प्रदर्शना दरम्यान करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. स्टॉल बुकिंग आजपासून खुली केली असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून २३ नोव्हेबर रोजी लकी ड्रॉ द्वारे स्टॉल्सचे वितरण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई महाराष्ट्राच्या सल्लागार समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर, किरण चव्हाण,सुरेश पाटील यांच्या सहित क्रेडाई सदस्य, वित्तीय संस्थेचे अधिकारी, बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध साहित्यांची कंपनी, नाशिक शहरातील विविध व्यापारी संस्थेचे पदाधिकारी/ अधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल आहेर यांनी आभार प्रदर्शन केले.property expo

बातमी वाचयला कृपया लिंक क्लिक करा.
न्यायालयाचा पूर्ण निकाल वाचा बातमी साठी लिंक क्लिक करा.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.