लासलगाव(वार्ताहर)निफाड तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या लासलगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी जयदत्त सीताराम होळकर तर उपसरपंच पदी अफजल नसीर शेख यांची गुप्त मतदानाद्वारे झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून निवड करण्यात आली.या वेळी ग्रामविकास पॅनल चे १० सदस्य व परिवर्तन शहर विकास पॅनल चे ७ सदस्य उपस्थित होते.Sarpanch
लासलगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनल च्या वतीने जयदत्त सीताराम होळकर आणि सायली संजय पाटील यांचे अर्ज आले तर परिवर्तन शहर विकास पॅनल च्या वतीने रोहित बाळासाहेब पाटील यांचा सरपंच पदासाठी अर्ज आला होता तर उपसरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनल च्या वतीने अफजल नासिर शेख व परिवर्तन शहर विकास पॅनल च्या वतीने ज्योती गणेश निकम यांचा अर्ज आला होता.
सरपंच पदासाठी दाखल केलेल्या अर्जदार सायली संजय पाटील यांनी माघार घेतली.या वेळी परिवर्तन शहर विकास पॅनल चे अमोल सुदाम थोरे यांनी गुप्त मतदानाची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी महेश नागपूरकर यांनी सरपंच व उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान प्रक्रिया पार पाडली
या गुप्त झालेल्या मतदान प्रक्रियेत ग्रामविकास पॅनल चे जयदत्त सीताराम होळकर यांना १० मते पडली तर परिवर्तन शहर विकास पॅनल चे विरोधी उमेदवार रोहित बाळासाहेब पाटील यांना ७ मते मिळाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी महेश नागपूरकर यांनी जयदत्त होळकर यांना सरपंच म्हणून विजयी घोषित केले.तर उपसरपंच पदासाठी झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत ग्रामविकास पॅनल चे अफजल नासिर शेख यांना १० मते तर परिवर्तन शहर विकास पॅनल च्या विरोधी उमेदवार ज्योती गणेश निकम यांना ७ मते मिळाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी महेश नागपूरकर यांनी अफजल शेख यांना उपसरपंच म्हणून विजयी घोषित केले.Sarpanch
या वेळी ग्रामविकास पॅनल चे सदस्य जयदत्त सीताराम होळकर,नानासाहेब दत्ताजी पाटील,चंद्रशेखर गोविंदराव होळकर,अनिता अक्षय ब्रम्हेचा,डॉ सायली संजय पाटील,रेवती गुणवंत होळकर,अफजल नासिर शेख,पुष्पा पंडित आहिरे,योगिता योगेश पाटील,रामनाथ मगन शेजवळ तसेच परिवर्तन शहर विकास आघाडी चे सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप,संगीता कल्याणराव पाटील,संतोष रामकीसन पलोड,अश्विनी नामदेव बर्डे,रोहित बाळासाहेब पाटील,अमोल सुदाम थोरे,ज्योती गणेश निकम उपस्थित तसेच संजय पाटील,शंतनू पाटील,जगदीश होळकर,गुणवंत होळकर,संतोष ब्रम्हेचा,गोकुळ पाटील,कुसुमताई होळकर,रंजना पाटील,नीता पाटील,पुष्पाताई दरेकर,वेदिका होळकर आदी उपस्थित होते.
या वेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून महेश नागपूरकर यांनी कामकाज पहिले तर ग्रामसेवक शरद पाटील आणि तलाठी नितीन केदार यांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तसेच लासलगाव पोलीस ठाण्याचे पो उ नि अजिनाथ कोठाळे,स पो उ नि देविदास लाड व पोलीस नाईक प्रदीप अजगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.Sarpanch