राज्य लॉन टेनिस स्पर्धेसाठी शताक्षी दरेकर करणार नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व

नाशिक : येथील निवेक स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित नाशिक विभागीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत नाशिक केम्ब्रिज विद्यालयाच्या शताक्षी दरेकर हिची नाशिक विभागाच्या संघात निवड झाली. पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद लॉन टेनिस स्पर्धेत शताक्षी नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करेल. Shatakshi Darekar Lawn Tennis

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन तिने द्वितीय क्रमांक पटकावत चांगले यश संपादन केले. या कामगिरीच्या आधारे तिची नाशिक विभागाच्या संघात निवड झाली.

शताक्षी गेल्या ५ वर्षांपासून, इंदिरानगर येथील श्री. मोदकेश्वर सेवा ट्रस्टच्या लॉन टेनिस क्लब येथे टेनिसचे मार्गदर्शक जयंत कर्पे, भारत दाभाडे, मयूर खरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

शताक्षीने या आधीही फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ज्युनीयर गटाच्या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे या राज्य स्पर्धेतही शताक्षी उत्तम खेळ करून विजय प्राप्त करेल असा विश्वास तिचे प्रशिक्षक जयंत करपे, ज्येष्ठ खेळाडू शशांक पगार, विजय खरोटे यांनी वक्त केला आहे.

Shatakshi Darekar Lawn Tennis

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “राज्य लॉन टेनिस स्पर्धेसाठी शताक्षी दरेकर करणार नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.