नाशिक जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करा; भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : जिल्ह्यातील तीव्र टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. severe water scarcity district govt declares scarcity prone Bhujbal’s demand

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव, निफाड, मालेगांव, बागलाण, कळवण, देवळा, चांदवड, सिन्नर, पूर्व दिंडोरी, पूर्व नाशिक सह बहुतांश भागात माहे जुलैपासून पाऊस झालेला नाही. जूनमध्ये थोडा फार पाऊस झाला त्यामुळे काही भागात पेरणी झाली तर काही ठिकाणी अद्यापही खरीपाची पेरणी झालेली नाही. खरीपाच्या पिकांना जुलै-ऑगस्ट या काळात पाण्याची खूप गरज असते. मात्र पाऊस नसल्यामुळे उगवलेली पिके धोक्यात आली आहेत. पिकांनी माना खाली टाकल्या असून पिकांची वाढ थांबली आहे. आता दुबार पेरणी करणे शक्य नसल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. severe water scarcity district govt declares scarcity prone Bhujbal’s demand

त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून टँकरची मागणी वाढत आहे. जनावरांचा चारा व जनावरांच्या पाण्याची सुद्धा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम तर हातातून गेलाच आहे. मात्र काही दिवसांत पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामाच्याही आशा मावळणार आहेत. त्यामुळेजिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करून त्याबाबतच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

severe water scarcity district govt declares scarcity prone Bhujbal’s demand
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.