रोटरी क्लबतर्फे साक्षरता दिनानिमित्त ७४ गुणवंत​ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’

tmp_2543-dsc_0191-1639171895

प्रत्येक शिक्षकाने डिजिटल व्हावे : देवकर
नाशिक : नुकताच साजरा झालेला शिक्षक दिन आणि जागतिक साक्षरता दिनानिमित्ताने ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक-ग्रेप सिटी’तर्फे मंगळवार, दि. १३ रोजी एका कार्यक्रमात शिक्षणक्षेत्रात आपल्या आगळ्या कामाने ठसा उमटविणाऱ्या तब्बल ७४ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर दैनिक देशदूतचे कार्यकारी संचालक आणि संपादक विश्वास देवकर, नाशिक पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल शहारे, क्लबच्या असिस्टंट गव्हर्नर रोटे. सौमित्री दास, रोटे. आशा वेणूगोपाल, अध्यक्ष असिफ शेख, सचिव दुर्गा साळी आणि प्रकल्प प्रमुख राधा पिल्लई उपस्थित होते.
समाजाची नवीन पिढी घडविताना नवनवीन प्रयोग करून आपल्या कामाने नवा आदर्श निर्माण करणारे जिल्हा परिषद शाळांचे ५०, महानगर पालिका शाळांचे १२ तसेच आदिवासी भागात असणाऱ्या आश्रम शाळा आणि शहरातील खाजगी शाळांतील शिक्षकांचा यात समावेश होता. या सर्व शिक्षकांचा सत्कार व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुरस्कार मिळालेले सर्व शिक्षक रोटरीच्या साक्षर भारत या मोहिमेला नक्कीच हातभार लावतील असा विश्वास आपल्या अध्यक्षीय भाषणात देवकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रत्येक शिक्षकाने शाळा दिगीतल करण्याचा आग्रह करताना स्वतः डिजिटल व्हावे. अशा समारंभातून चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचे मनोबल वाढवणे महत्वाचे आहे. सध्या पालकांना मुलांसाठी जास्त वेळ उपलब्ध नसताना शिक्षकच मुलांना घडविण्याचे पवित्र भूमिका पार पाडत आहेत. विस्कळीत समाजाला मार्गावर आणण्याचे काम शिक्षक करतात असा इतिहास आहे. पैगंबर, कृष्ण, येशू ख्रिस्त अशा प्रेषितांनी नेहमीच समाज कल्याणाचे स्वप्न पहिले आहे. शिक्षक हे याच प्रेषितांचे वारसदार असल्याचे मत देवकर यांनी मांडले.

नवीन पिढीला योग्य दिशा देणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या पुढील कार्यास प्रोत्साहन देण्याकरिता या सत्काराचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष असिफ शेख यांनी केले.

रोटरी क्लबच्या वतीने जागतिक स्तरावर राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेनंतर साक्षर भारत हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता विविध मार्गानी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यात शिक्षकांना प्रशिक्षण, शाळांमध्ये सोयीसुविधा, हॅपी स्कूलिंगसाठी कार्य करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

पुरस्कार मिळालेल्या विस्तार अधिकारी वंदना चव्हाण आणि शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जयंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. पंकज दशपुते यांनी आभार मानले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.