नाशिक सेपकटकरा स्पर्धा : पुरुषांत एनएससीसी, महिलांत युनाइटेड क्लबला अजिंक्यपद

नाशिकच्या संघाची प्राथमिक निवड

नाशिक :- नाशिक जिल्हा सेपकटारा असोसिएशन आणि  के. एन. डी. मंडळाच्या संयुक्त विद्यमाने  गोरक्ष नगर, मेरी रोड, पंचवटी  येथे वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या नाशिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांत एनएससीसी, महिलांत युनाइटेड क्लबला अजिंक्यपद मिळाले आहे. sepak takraw nashik district championship nscc male united women won

पुरुषांच्या के.एन. डी क्लब आणि   एन. एस. सी. सी. क्लब  यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात  चांगलीच चुरस बघायला मिळाली. पहिल्या सत्रात  के.एन .डी क्लबच्या हेमंत सपकाळे आणि प्रशांत आबड यांनी चांगली सुरवात करून ६ विरुद्ध ४ अशी दोन गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मात्र   एन. एस. सी. सी. क्लबच्या खेळाडूंनी आपापसात चांगला समन्वय साधून खेळावर नियंत्रण मिळविले.

दुसऱ्या सत्रात  एन. एस. सी. सी संघाच्या हर्षद दरगोडे आणि अमोल राठोड यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत जोरदार स्मेशेस लगावून ८-८ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही त्यांनी योगेश चव्हाण यांच्या साथीने असाच जोमाने खेळ करत हा सामना १२ विरुद्ध १० असा जिंकून या स्पर्धेचे पुरुषांचे विजेतेपद पटकावले. त्यापूर्वी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात पी. व्ही. जी क्लब संघाने के.टी.एच. एम. संघाचा ०९ विरुद्ध ०५ असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले.

महिलांच्या युनायटेड स्पोर्ट्स क्लब, सिडको  आणि  के. एन. डी. क्लब यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सिडकोच्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबने के.एन.डी.  क्लब संघाला ०७ विरुद्ध ०४ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. sepak takraw nashik district championship nscc male united women won

या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या संघाला प्रमुख पाहुणे छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते चषक, पदके आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे त्यांची नाशिक जिल्हाच्या संभाव्य संघासाठी प्राथमिक निवड करण्यात आली. या प्राथमिक संघात निवड झालेल्या खेळाडूंचे दिनांक २५ एप्रिल ते २ मे दरम्यान सराव  शिबीर आयोजित केले जाणार आहे.

त्यानंतर संघाची अंतिम निवड केली जाणार असून अंतिम संघात निवड झालेले खेळाडू ३ मे ते ५ मे दरम्यान आयोजित होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्हातर्फे सहभागी होतील अशी माहिती स्पर्धा सचिव कुणाल अहिरे आणि संचालक दीपक निकम यांनी दिली. sepak takraw nashik district championship nscc male united women won

अंतिम  निकाल 

 पुरुष गट :

१)  एन. एस. सी. सी . क्लब  प्रथम  क्रमांक

२)   के.एन डी क्लब –  दुसरा क्रमांक

 ३)  पी.  व्ही. जी क्लब –  तीसरा क्रमांक

महिला गट :

१)  युनायटेड स्पोर्ट्स क्लब  क्लब –  प्रथम  क्रमांक

२)   के.एन डी क्लब –  दुसरा क्रमांक

 ३)    के.टी.एच. एम. संघ  –  तीसरा क्रमांक

फोटो ओळ :-  नाशिक जिल्हा सेपाकटकरा असोसिएशन आणि  के. एन. डी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित नाशिक जिल्हा सेपाकटकरा  अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पुरुषांच्या  एन. एस. सी. सी . क्लब आणि युनाइटेड  स्पोर्ट्सच्या मुलीच्या संघाला पारितोषेक देऊन सन्मानित करतांना प्रमुख पाहुणे अशोक दुधारे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे. सोबत कुणाल अहिरे, दीपक निकम आदी.

sepak takraw nashik district championship nscc male united women won

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.