सिनेट निवडणुक : ४८.१५ टक्के मतदान ,मतमोजणी २७ नोव्हेंबरला

पुणे विद्यापीठ अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील १७ केंद्रांतील २५ बुथवर मतदान पूर्ण झाले आहे. यामध्ये सरासरी पाहता ४८.१५ टक्के मतदान झाले आहे. नाशिक  जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८१३ मतदारांपैकी ४ हजार ७२५ मतदारांनी मतदान केले आहे. सिनेट जागेच्या या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबरला आहे.

शहरात ऐकून एकूण ४०.१५ टक्के मतदान झाले. येवला येथे अधिक असे  ७३ टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी ३६ टक्के मतदान शहरातील एचपीटी महाविद्यालयातील केंद्रावर झाले आहे. नाशिक जिल्ह्यातून तिन्ही पॅनलमध्ये ही निवडणूक होती. तर ऐकूण असे  सहा उमेदवार उभे आहेत. २७ नोव्हेंबर रोजी विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फेनाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यांत सिनेटच्या पदवीधर आणि व्यवस्थापन विभागासाठी शहरातील सहा केंद्रांवर तर जिल्ह्यातील ११ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था होती. शहरातील के. के. वाघ महाविद्यालय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय आणि नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केले आहे.

केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी :

  • एन. नाईक महाविद्यालय ४४ टक्के
  • एचपीटी महाविद्यालयातील केंद्रावर ३६ टक्के
  • सिडको महाविद्यालयात ४४ टक्के,
  • के. के. वाघ महाविद्यालयात ४० टक्के,
  • नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ३८.७,
  • भोसला महाविद्यायात ४५,
  • मनमाड येथील केंद्रात ६४,
  • इगतपुरीत ६९,
  • मालेगावी ४६, देवळ्यात ६७.२५
  • कळवणमध्ये ७०.१८, येवल्यात १३,
  • सटाणा येथे ६४, दिंडोरीत ६८,
  • सिन्नरमध्ये ६१, चांदवडला ४७,
  • पिंपळगाव येथे ५५ टक्के मतदान
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.