आता आपण बघणार आहात ते छायाचित्र नसून ही एक भव्यदिव्य अशी रांगोळी आहे. खास श्रावणी सोमवारचे निमिताने मालेगांवकरांनी साकारलेल्या भव्यदिव्य अशा रांगोळीतुन भगवान महादेव यांची विविध रूपे आणि पार्वती माता यांच्यासह घडलेल्या प्रसंगाची कथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालेगावचे कलाकार प्रमोद आर्वी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही रांगोळी साकारली आहे.
अशी आहेत रांगोळीची वैशिष्ट्ये :
- ही रांगोळी शुक्रवार रात्री १० वाजे पासून साकारण्यास सुरुवात केली गेली. ती न थांबता सलग ४० तास रांगोळी काढण्याचे काम सुरु राहिले. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत रांगोळी पूर्ण साकारण्यात आली.
- रांगोळीचा आकार ९×१९ एवढा आहे.
- हुबेहूब चित्रासारखी दिसणारी ही रांगोळी साकारण्यासाठी सांगली येथून ( लेख रंग ) रंग मागविण्यात आले होते.
- एकूण ५५ किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
बघा अशी आहे रांगोळी :
मालेगांव येथील राजराजेश्वरी संचलित साई आर्ट क्लासेसच्या माध्यमातून प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका पाटणकर, पूजा बच्छाव, श्रद्धा बागुल, राधिका महाले, मीनल जाधव, मोनाली बच्छाव ,हर्षदा जाधव , कावेरी पाटिल (चाळीसगाव), मनीषा चौधरी (जळगाव), अनिकेत शेवाळे, कल्पेश महाले, अमेय अळसुंदेकर, संदीप आव्हाड, प्रशांत आदी कलाकारांचा समावेश होता.
सदर रांगोळीचे रांगोळी प्रदर्शन ३ दिवस खुले राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी ही अनोखी रांगोळी पाहण्यासाठी यावे असे संचालक प्रमोद आर्वी यांनी आवाहन केले आहे. पत्ता : प्रमोद आर्वी मो.7840967627 साई आर्ट क्लासेस, लोकमान्य हॉस्पिटल तिसरा मजला, सटाणा नाका, मालेगांव.