bar पंचवटीत 2 बार सील तर 1 बारला पाच हजाराचा दंड,

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट व बार यांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश आहेत.परंतु एकदा दंडात्मक कारवाई करून ही नियमाचे पालन न करणाऱ्या पल्लवी आणि पंजाब बार रविवार (ता.२८) रोजी सील करण्यात आले .तसेच, दिंडोरी रोडवरील महाराणा रेस्टॉरंट व बारला पाच हजार रुपये दंड करण्यात आला.सदर कारवाई पंचवटी विभागीय कार्यालय व पंचवटी पोलिस पथकाने केली.यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. bar
              कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना प्रशासनाने नियम कठोर केले आहे .कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहिर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने दररोज सायंकाळी आठ वाजेच्या आत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दर शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व प्रकारचे दुकाने दिवसभरात पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आहेत.तरीही लाॅकडाऊन दरम्यान काही दुकाने चालू असल्याचे दिसून येत असल्याने मनपा व पोलीस पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेषतः दुकानांमध्ये गर्दी होऊन शासकीय नियमांचे उल्लंघन होऊन कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळे शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीही मनपा पथक व पंचवटी पोलिस संयुक्त विद्यमाने कारवाई दररोज सुरू आहे. bar
पंचवटीत पंजाब रेस्टारंट अँड बार,पल्लवी बार सील तर महाराणा बारला पाच हजाराचा दंड,
पंचवटीत पंजाब रेस्टारंट अँड बार,पल्लवी बार सील तर महाराणा बारला पाच हजाराचा दंड,
            या दरम्यान पंचवटीतील मालेगांव स्टॅण्ड येथील पंजाब रेस्टारंट अँड बार आणि नवीन आडगाव नाका येथील पल्लवी बारला काही दिवसांपूर्वी वेळेत बंद करण्याची ताकीद देत पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.परंतु रविवार (ता.२८) रोजी पुन्हा एकदा शासनाच्या नियमाचे उल्लघन करीत पंजाब आणि पल्लवी बार वेळेत बंद केले नाही आणि ग्राहकांमध्ये सामायिक अंतर ठेवले नसल्याने त्यांचे बार सील करण्यात आले . तसेच दिंडोरी रोडवरील तारवाला नगर येथील महाराणा बारवर दंडात्मक कारवाई करीत पाच हजार रुपये दंड करण्यात आला.bar
            सदरची कारवाई सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत,पंचवटी विभागीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विवेक धांडे,मनपाचे पथक प्रमुख सहायक अधीक्षक भूषण देशमुख,राजेंद्र सोनवणे,प्रकाश उखाडे,किरण मारू यांनी केली . यापुढे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे.असे आवाहन पोलीस आणि मनपाकडून करण्यात आले आहे. 
चौकट : मालेगांव स्टॅण्ड येथील पंजाब रेस्ट्रो अँड बार रविवारी सील केल्यानंतर सोमवार दि २९ रोजी सील तोडून पुन्हा बारमध्ये दारू विक्री सुरू केल्याने पोलीस आणि मनपा अधिकारी यांनी जवळपास तीन तास पंचनामा करीत बार सील केला .bar
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.