‘पोलिस कृतज्ञता दिन’ करा पोलिसांना धन्यवाद !

(परिपत्रकाद्वारे दोन संघटनाचे आवाहन देत आहोत.)

गत दोन वर्षांच्या कालावधीत नाशिक शहर पोलीस, एन.जी.ओज, विविध सामाजिक संस्था, डॉक्टर्स, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व जागरूक सामान्य नागरिक एकत्र येऊन शहरातील सामाजिक समस्या व सुधारणा यावर ‘चर्चा व प्रत्यक्ष उपाययोजना’ यासाठी सातत्याने झटत आहेत, हे शासन व समाज यांच्यातील ‘एकात्मता व समन्वय’ याचं सर्वोत्तम उदाहरण होय. परिणामस्वरूप ‘आवाज प्रदूषण, वाहतूक नियमन, नशाबंदी’ यासह अनेक गंभीर प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे, जी आपल्या शहरासाठी अत्यंत ‘आनंदाची, समाधानाची व अभिमानाची बाब होय!

‘पोलीस व समाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ११ मे २०१८ हा दिवस ‘कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. सकाळी ११ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत समस्त ‘नाशिककर व पोलीसदल’ पोलीस ठाण्यात भेटून सद्भावना व्यक्त करतील. आपण आपल्या इष्ट, मित्र व परिवारासमवेत या उपक्रमात सहभाग नोद्वून आनंद व उत्साह द्विगुणीत करावा, ही विनंती!

अतिशय सुंदर ‘विचार, संकल्पना व कार्यप्रणाली’ याने ओतप्रोत भारलेल्या या आनंद सोहळ्याचा सांगता समारंभ याच दिवशी ‘मुक्तांगण – नाशिक पोलीस मुख्यालय’ येथे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत संपन्न होणार आहे.आपल्या सारख्या मान्यवरांनी, सामान्य नागरिक व पोलीसदल यांच्यातील ‘अभूतपूर्व सद्भावना सोहळ्यास’ उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही मनापासूनची इच्छा व सहृदय निमंत्रण!

आपले नम्र

एनसी देशपांडे , डॉ.शैलेन्द्र गायकवाड व ज्योती वाकचौरे
कृतज्ञता फौंडेशन, नाशिक आणि गिरीश पाटील


आपण नाशिककर ११ मे रोजी संपूर्ण शहरभर “ पोलीस कृतज्ञता दिन” साजरा करत आहोत
११ मे रोजी आपण नाशिककर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावून आपल्या पोलीस बांधवांचे आभार मानणार आहोत*.
सामान्य नागरिक आणि पोलीस बांधव यांच्यातील सुसंवाद वाढून अपप्रवृत्तींना नैतिक धाक निर्माण व्हावा, पोलीस दल आणि सकारात्मक नागरिक सोबत आहेत हा संदेश संपूर्ण समाजात पोहचावा म्हणून आपण ‘ पोलीस कृतज्ञता दिन’ साजरा करत आहोत*. हे आपले पोलीस बांधवांप्रती कर्तव्य आहे.
पोलीस वर्दीतील सामान्य माणुस आहे…
आणि आपण सामान्य माणुस बिनावर्दीतील पोलीस…
आपले पोलीस आपले मित्र
पोलींसाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांचे प्रबोधन करू या…
११ मे पोलीस बांधवांच्या जीवनाचा विस्मरणीय दिवस बनवू या*….

मी नाशिककर
भारतीय मानवाथिकार परिषद नाशिक परिवार सर्व पदाधिकारी सदस्य हितचिंतक तसेच ह्या उपक्रम साठी आमच्या विनंती ला मान देऊन आपल्या नाशिकच्या मिसेस इंडिया इन्टरनशनल शिल्पी अवस्थी मँडम तसेच मिसेस तरनुम शेख, मिसेस क्लसीक फेमिना सागा 2018* ह्या सुध्दा आपल्या सोबत उपस्थितीत राहणार आहे तरी आपण सगळ्यांनी *सकाळी ठिक 10.00 वाजता म्हसरूळ पोलीस स्टेशनला आर टी ओ काँनर दिडोंरी रोड* येथे ह्या उपक्रमाची सुरुवात करून 11.00वाजता *पंचवटी ,11.30 आडगांव, 12.30 ,नाशिकरोड उपनगर इंदिरानगर ,अंबड सातपुर गंगापुर सरकार वाडा भद्रकाली मुंबई नाका पोलीस स्टेशनला* सुध्दा जायचे आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे आपल्या परिवारातील लोकांना घेऊन आले तरीही चालले. येताना फुले आणि चाँकलेट घेऊन येणे.


Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.