छत्रपती शिवाजी स्टेडियम वाचवण्यासाठी सरसावल्या क्रीडा संघटना; बैठकीचे आयोजन

नाशिक महानगर पालिकेने नुकताच अशोक स्तंभ ते गडकरी चौक पर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोडची घोषणा केलेली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम, सी.बी.एस. नाशिक येथे संकल्पित दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली आहे. save chhatrapati shivaji stadium nashik Sports Association meeting smart city

मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम हे मैदान कायमस्वरूपी फक्त खेळासाठी उपलब्ध ठेवावे असे निर्देश असतांना सुद्धा स्मार्ट सिटी करताना अशा मैदानाचा बळी देणे चुकीचे ठरणार आहे. नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध असलेले एकुलते एक मैदान शिल्लक आहे.

त्यामुळे तिथे होणाऱ्या भुयारी वाहनतळाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना सरसावल्या आहेत. संघटना, क्रीडा संस्था तसेच क्रीडा संघटक पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक येत्या १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ .०० वा. आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील फुटबॉल असो. च्या कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. save chhatrapati shivaji stadium nashik Sports Association meeting smart city

तरी सर्व जिल्हा संघटनेच्या प्रतिनिधींनी या सभेला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव या मोहिमेला बळ द्यावे अशी विनंती नाशिक जिल्हा जिमन्यास्टिक असो. अध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे, जिल्हा खो-खो असो. अध्यक्ष रमेश भोसले, फुटबॉल असो. अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सचिव अर्जुन टिळे, महाराष्ट्र खो-खो असो. कार्याध्यक्ष मंदार देशमुख, क्रीडा संघटक अविनाश खैरनार, आनंद खरे, उमेश आटवणे यांनी केले आहे.

save chhatrapati shivaji stadium nashik Sports Association meeting smart city

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.