कॉंग्रेसवर टीका, सावरकर एक व्यक्ती नव्हते तर संस्था होती : मुख्यमंत्री

काँगेस आणि मणिशंकर अय्यर यांच्यावरही टीका

सावरकरांच्या स्मारकासाठी ६५ लाखांचा निधी

नाशिक : सावरकर हे एक व्यक्ती नव्हते तर संस्था होती. कॉंग्रेसने सावरकरांना स्वीकारले नाही. सावरकरांवर कायम अन्याय झाला. १९४७ च्याआधी ब्रिटिशांनी अन्याय केला. त्यानंतर राजकारण्यांनी अन्याय केला. त्यावेळी राज्यकर्त्यांना सावरकर यांच्या प्रतिभेतून आपण झाकोळून जाऊ ही भीती होती. म्हणून त्यांनी सावरकरांना कधी मोठे होऊ दिले नाही. अंदमानमधील त्यांचे नाव पुसुन टाकण्यांचेकाम काही मंत्र्यांनी केले. एसी गाड्यातून फिरणाऱ्या या मंत्र्यांनी दहा दिवस अंदमानला जाऊन राहावे अशी टीका नाव न घेता काँगेस आणि मणिशंकर अय्यर यांच्यावर मुख्यत्र्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे जन्मगाव भगूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे निमंत्रक प्रसाद लाड, मुख्यमंत्र्‌यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमोल एडके, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

भगूरकर भाग्यवान आहेत, सावरकरवाङा मंदीर आहे. सावरकर स्मारक दर्शन मंदिरापेक्षा पवित्र आहे. सावरकरांनी समाजातील जातीभेद, विषमता याबरोरच समाजातील रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सावरकरांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ६५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहितीमहाजन यांनी दिली. त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. स्मारकस्थळी अभिप्राय नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदविला.

तेजस्वीता, तपस्वीता आणि त्यागाचे मुर्तीमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतीकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. बारा वर्षापेक्षा अधिक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहे असे फडणवीस यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘संस्कार भारती’ने काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाची पाहिले. त्यानंतर नंदेश उमप यांनी सादर केलेल्या‘शतजन्म शोधीतांना’ या स्वा. सावरकर यांच्या गीतांच्या कार्यक्रमा झाला.

बघा फडणवीस यांची भगूर येथील सावरकर स्मारकाच्या भेटीची चित्रफित…

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.