एसी गाड्यातून फिरणाऱ्यांनी दहा दिवस अंदमानला जाऊन राहावे : मुख्यमंत्री

काँगेस आणि मणिशंकर अय्यर यांच्यावरही टीका

सावरकरांच्या स्मारकासाठी ६५ लाखांचा निधी

नाशिक : सावरकर हे एक व्यक्ती नव्हते तर संस्था होती. कॉंग्रेसने सावरकरांना स्वीकारले नाही. सावरकरांवर कायम अन्याय झाला. १९४७ च्याआधी ब्रिटिशांनी अन्याय केला. त्यानंतर राजकारण्यांनी अन्याय केला. त्यावेळी राज्यकर्त्यांना सावरकर यांच्या प्रतिभेतून आपण झाकोळून जाऊ ही भीती होती. म्हणून त्यांनी सावरकरांना कधी मोठे होऊ दिले नाही. अंदमानमधील त्यांचे नाव पुसुन टाकण्यांचेकाम काही मंत्र्यांनी केले. एसी गाड्यातून फिरणाऱ्या या मंत्र्यांनी दहा दिवस अंदमानला जाऊन राहावे अशी टीका नाव न घेता काँगेस आणि मणिशंकर अय्यर यांच्यावर मुख्यत्र्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे जन्मगाव भगूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भगूरकर भाग्यवान आहेत, सावरकरवाडा मंदीर आहे. सावरकर स्मारक दर्शन मंदिरापेक्षा पवित्र आहे. सावरकरांनी समाजातील जातीभेद, विषमता याबरोरच समाजातील रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

तेजस्वीता, तपस्वीता आणि त्यागाचे मुर्तीमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतीकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. बारा वर्षापेक्षा अधिक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहे असे फडणवीस यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

बघा फडणवीस यांची भगूर येथील सावरकर स्मारकाच्या भेटीची चित्रफित…

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.