रस्ता ओलांडत असताना वाहनाने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलीचा मृत्यू 

सातपूर परिसरातील असलेल्या  त्र्यंबक महामार्गावरील महापालिका सातपूर विभागीय कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असताना टाटा ४०७ ट्रक ने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलीचा मृत्यू  झाला आहे . आज सकाळी रविवारी ४ मार्च रोजी  सकाळी १० वाजता घडली आहे. सातपूर पोलिसांनी याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मूळ बिहार येथी असलेल्या  रूखसार अन्सारी (वय १२) सध्या सातपूर राजवाडा असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

आपल्या नातेवाईकांना बस स्टँड वर सोडवण्यास  रूखसार ही आपल्या दाजी व नातेवाईकांसोबत आली होती.तेव्हा कलायतन कुरियरच्या टाटा ४०७ क्रमांक एम एच ०४-३४२३ ने स्टँड वरून घरी जात असताना रूखसारला जोरदार धडक दिली आहे.  या अपघातात ती जागीच ठार झाली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. वाय देवरे करत आहे.

Like Our Page :https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.