दोन खून : सातपूर परिसरात तरुणाची दगडाने ठेचून तर चेहडी दारणा काठावर संशयास्पद मृतदेह

नाशिक : सातपूर परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाली आहे. हि हत्या ईएसआय हॉस्पिटल जवळील घटली आहे. मात्र अजून तरी या  हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस घटना स्थळी पोहोचली आहे. नाशिकमध्ये एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण विटकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. नाशिकमधल्या सातपूर परिसरातल्या इएसआय हॉस्पिटलजवळ त्याचा मृतदेह आढळला आहे.रात्री या ठिकाणी पार्टी झाली असावी आणि दारुच्या नशेत त्याचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.सातपूर येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णायाच्या (ईएसआय) आवारात दुधाच्या टपरी मागे जयप्रकाश नगर (ईएसआय भिंतीलगत) येथील लक्ष्मण हुलगप्पा विटकर या 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजू मुकेश विटकर वय 30 राहणार जयप्रकाश नगर याने सातपूर पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली आहे

दुसरीकडे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत चेहडी जवळ दारणा नदीकाठावर संशयास्पद मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. शहरात एकाच रात्रीत दोन खून झाल्यानं पोलीस खडबडून जागे झाले आहेत.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.