भंगार बाजारावर हातोडा, १६९ ट्रक स्क्रॅप जप्त

पुढील दोन दिवस चालणार कारवाई

नाशिक : जानेवारी २०१७ मध्ये मोठी कारवाई करून साफ करण्यात आलेला अंबड लिंक रोड वरील भंगार बाजारा पुन्हा एकदा उभा राहिल्याने त्यावर दुसऱ्यांदा कारवाई करत हातोडा पाडण्यात आला आहे. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही किरकोळ वाद सोडल्यास कारवाई सुरळीतपणे पार पाडत असून अजून पुढील दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे.

Satpur ambad link road scrap market bhangaar bajar भंगार बाजार nashik नाशिक

या कारवाईदरम्यान पहिल्या दिवशी १६९ ट्रक माल जप्त करण्यात येऊन तो सातपूर क्लब हाऊसच्या डम्पिंग ग्राऊंड वर ठेवण्यात आला आहे. आज (दि. १३) भंगार बाजाराच्या मुख्य भागात कारवाई कारण यात येणार आहे.

रस्ते बंद, शालेय वाहनांना परिसरात प्रवेश नाही

आज झालेल्या कारवाई दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वतः पोलीस आयुक्त डॉ. सिंगल मनपा व पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना करताना दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने पपया नर्सरी ते एक्सलो पॉईंट पर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारीत हटवण्यात आलेला हा भंगार बाजार उठवण्यात आला होता. मात्र पुन्हा अतिक्रमण झालेला हा बाजार पुन्हा एकदा बसल्याने स्थानिक नगरसेवक दिलीप दातीर यांनी तक्रार केली होती. दिलीप दातार यांनीच यापूर्वी न्यायालयीन लढा यशस्वीपणे दिल्यामुळे ही कारवाई शक्य होत आहे.

Satpur ambad link road scrap market bhangaar bajar भंगार बाजार nashik नाशिक

कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात कोळसा आढळून आला आहे. यामागचे कारण शोधले जात आहे. परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजय मगर, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, अंबाफ पोलीस ठाण्याचे मधुकर कड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल महाजन यांच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.