सटाणा : गतिरोधकामुळे शिवशाही बसला अपघात; ट्रकला मागून धडक

सटाणा- (प्रशांत कोठावदे) :- विंचुर प्रकाशा राज्य महामार्गावरील विरगाव फाट्यावर मंगळवारी (दि. 3) नाशिक नंदुरबार या शिवशाही बसचा अपघात झाला आहे. यात शिवशाही बसचे पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. Satana shivshahi bus accident truck strike behind speed breaker

Satana shivshahi bus accident truck strike behind speed breaker

गतिरोधकाला पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे ट्रक चालकाला गतिरोधक लक्षात आले नाही. त्यामुळे ट्रक चकाकाने अचानक ब्रेक लावले. यावेळी मागून येणाऱ्या शिवशाहीने ट्रकला पाठीमागुन धडक दिली.

थोडक्यात निभावल्या कारणाने सुदैवाने यात कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही. या अपघातामुळे दोन पदरी या रस्त्यावर सुमारे तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

NashikOnWeb चे फेसबुक पेज

Satana shivshahi bus accident truck strike behind speed breaker
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.