सटाणा : भरधाव डंपरमुळे बसला अपघात

सटाणा- प्रशांत कोठावदे

ताहाराबाद गावाच्या अलीकडे विंचूर प्रकाशा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या वाळु डंपरने नंदुरबार-नाशिक (एम. एच. २० बीएल २३१०) बसला कट मारल्याने अपघात घडला. वाळू डंपरचालकाने डंपर घेऊन पळ काढला होता. परंतु स्थानिक तरूणांनी डंपरचा पाठलाग करून पिंपळनेर (ता. साक्री) हद्दीत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. Satana taharabad ccident speedy dumper bus

याबाबत सविस्तर माहिती अशी, विंचूर प्रकाशा महामार्गावर दुपारी साडे बाराच्या सुमारास नंदुरबार नाशिक ही बस नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. ताहाराबाद गावाच्या अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बसला कट मारल्याने रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या खड्ड्यात बस जाऊन आदळली. यामुळे अकरा प्रवासी जखमी झाले आहेत.

Satana taharabad ccident speedy dumper bus

 

घटनास्थळावरून डंपरचालकाने डंपर घेऊन पळाला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून पिंपळनेर हद्दीत डंपर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. Satana taharabad ccident speedy dumper bus

किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ताहाराबाद येथील प्राथमिक उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही प्रवाशांना जास्त दुखापती झाल्यामुळे मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

अपघात झाला त्या ठिकाणी पुढेच मोठे झाड होते. मात्र पावसामुळे जमीन ओली असल्याने बसचे टायर खड्ड्यातच रूतल्याने मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी सांगितले. Satana taharabad ccident speedy dumper bus

जयखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित याच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला.

जखमीची नावे –
छाया संदिप साळुंखे, वय २७,ता. साक्री
गुरूदास बाबुराव ठाकरे, वय २३, नवापाडा, ता. साक्री
सुमनबाई साहेबराव आहिरे, वय ५५, चिंचखेड ता. साक्री
शोभाबाई भिका आहिरे, वय ५२, चिंचखेड ता. साक्री
जागृती संतोष भदाणे, वय २७, पिंपळनेर ता. साक्री
शैला दिलीप पाटिल, वय ६०, ता. साक्री
दिलीप मोतीराम पाटिल, वय ६३, ता. साक्री
संतोष अशोक भदाणे, वय ३५, पिंपळनेर ता. साक्री
गुलाबराव एकनाथ पाटिल, वय ६८,बल्हाणे ता. साक्री
संगिता महेंद्र चौधरी, वय ४०, नाशिक
संगिता पोपट बत्तिसे, वय ४६, सटाणा

Satana taharabad accident speedy dumper bus
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.