सटाणा : महाबीजकडून प्रात्यक्षिकासाठी मिळणाऱ्या मका बियाण्याची परस्पर विक्री; शेतकऱ्यांची फसवणूक

सटाणा प्रतिनिधी (प्रशांत कोठावदे) :

उनन्त शेती समृद्ध शेतकरी या योजने अंतर्गत व मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीज कडून शेतकऱ्यांना मोफत वितरीत होणारे प्रत्येकी दोन किलो मका बियाणे कृषी सहाय्यकाने परस्पर एका व्यापाऱ्याला व काही शेतकऱ्यांना २००/-रुपये प्रतिकिलो विकून टाकल्याचा धक्का दायक प्रकाराची पोलखोल पिंपळकोठे गावाचे सरपंच किशोर भामरे यांनी केल्याने कृषी विभागासह बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. Satana mahabeej maze seeds fraud reciprocate sale farmers cheated nashik

Satana mahabeej maze seeds fraud reciprocate sale farmers cheated nashik, नाशिक सटाणा महाबीज मका बियाणे घोटाळा उनन्त शेती समृद्ध शेतकरी

धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे दिसू लागताच सबंधीत कृषी सहाय्यकाने प्रकरण रफादफा करण्यासाठी थेट पिंपळकोठे येथे धाव घेत सरपंच किशोर भामरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भामरे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरत मका बियाणे घोटाळा प्रकरण उघड केले. Satana mahabeej maze seeds fraud reciprocate sale farmers cheated nashik

राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाबीज कडून प्रत्येकी दोन किलो मका बियाणे मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत वितरीत केले जात आहे. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे गावाच्या सरपंचानी दिलेल्या माहितीनुसार गावाला २ क्विंटल मका बियाणे शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यासाठी पाठविले होते. मात्र कृषी सहाय्यक के. आर. पीठे यांनी हे मका बियाणे शेतकऱ्यांना मोफत न वाटप करता गावातील काही शेतकरी व एक बियाणे विक्रेत्याशी परस्पर व्यवहार करून २०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री करून शासनासह शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे.

Satana mahabeej maze seeds fraud reciprocate sale farmers cheated nashik, नाशिक सटाणा महाबीज मका बियाणे घोटाळा उनन्त शेती समृद्ध शेतकरी

कृषी सहाय्यक के.आर.पीठे यांचा मका बियाणे घोटाळा सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणला असून हा घोटाळा नुसता पिंपळकोठे गावापुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण तालुकाभर असल्याची शक्यता भामरे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आपण प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांची भेट घेवून या घोटाळ्याची तक्रार करणार असल्याचे भामरे यांनी म्हटले आहे.

“तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या गावासाठी उनन्त शेती समृद्ध शेतकरी या योजने अंतर्गत व मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीज कडून किती मका बियाणे आले आहे याची खात्री करून घ्यावी. कारण आपल्या तालुक्याचा कृषी विभाग हे भ्रष्टाचाराचे आगार आहे. येथे प्रत्येक योजनेत ठराविक लोकांनाच लाभ मिळतो.” – किशोर भामरे, सरपंच, पिंपळकोठे

“उनन्त शेती समृद्ध शेतकरी या योजने अंतर्गत व मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीज कडून शेतकर्यांना  बियाणे मोफत वितरीत होते तसेच आज जो प्रकार पिंपळकोठे येथे झाला त्याची चौकशी करुन संबंधितावर योग्य ती कारवाई करु.” – वाय. डी. मोरे, प्रभारी कृषी अधिकारी सटाणा

Satana mahabeej maze seeds fraud reciprocate sale farmers cheated nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.