सटाणा शहराला होणार मुबलक पाणीपुरवठा; ग्रामीण ऐवजी शहरी फिडरवरून वीजपुरवठा

सटाणा : शहरास पाणीपुरवठा करणारी मळगाव बंधाऱ्याजवळील उद्भव विहीर खोल करून या योजनेला ग्रामीण फिडर ऐवजी शहरी फिडरवरून वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असून टंचाई दूर होणार असल्याची माहिती उद्घाटन प्रसंगी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांनी येथे दिली. satana city water supply urban feeders nagar palika

नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष संगीता देवरे, गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, राकेश खैरनार, मुख्याधिकारी हेमलता डगळे प्रमुख पाहुणे होते. श्री. पाटील म्हणाले, पालिकेच्या मालकीच्या आरम नदीकिनाऱ्यालगत चार उद्भव विहिरी असून या सर्व विहिरींची खोली गेल्या कित्येक वर्षांपासून ५० ते ५५ फुटांपर्यंतच आहे. त्या तुलनेत परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी ह्या १०० पेक्षा अधिक फुट खोल गेल्या आहेत. टंचाई काळात पालिकेच्या विंधनविहिरी लवकर तळ गाठतात व खासगी विहिरींना मात्र मुबलक पाणी दिसते. त्यामुळे आपल्या उद्भव विहिरींचे खोलीकरण १०० फुटांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. खोलीकरणाबरोबरच्या विहिरींना आडवे बोअरही केले जाणार आहे. satana city water supply urban feeders nagar palika

यावेळी बांधकाम सभापती सुनिता मोरकर, आरोग्य सभापती दीपक पाकळे, महिला बालकल्याण सभापती निर्मला भदाणे, शिक्षण सभापती शमा मन्सुरी, नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, आशा भामरे, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संजय सोनवणे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, दीपक नंदाळे, पाणीपुरवठा अधीक्षक संजय सोनवणे, आनंदा सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

satana city water supply urban feeders nagar palika
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.