सटाणा शहराच्या सेवेत सहा नव्या घंटागाडी दाखल

सटाणा (प्रशांत कोठावदे) : सटाणा नगरपालिकेने शहरातील आरोग्य व स्वछता राखणे कामी नव्याने सहा घटांगाडी शहरवासीयांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. यामुळे शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तत्काळ जमा करणे शक्य होणार आहे. Satana City six new ghanta gadi arrived nagar palika

आज पासून (दि.14) शहरवासीयांच्या सेवेत दाखल केलेल्या घटांगाडीचे लोकार्पण सटाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनिल मोरे यांच्या हस्ते पालिका प्रवेशद्वार जवळ करण्यात आले.

शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी पालिका प्रशासनकडे अवघ्या ४ गाड्या होत्या. परिणामी या सेवांंवर ताण निर्माण होत होता. आता पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आता ताफ्यात आता 10 घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. नवीन घटांगाडींसह नव्याने रोजदारीवर सफाई कामगार भरती करण्यात आल्याचे यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. Satana City six new ghanta gadi arrived nagar palika

यावेळी उपनगराध्यक्षा संगिता देवरे, आरोग्य सभापती दिपक पाकळे गटनेते दिनकर सोनवणे, नितिन सोनवणे, नगरसेवक राकेश खैरनार, राहुल पाटील, नगरसेविका शमा मन्सुरी, डॉ. विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, भारती सुर्यवंशी, सुवर्णा नंदाळे आदी उपस्थित होते.

Satana City six new ghanta gadi arrived nagar palika
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.