Umrane Election Cancelled Nashik सरपंचपदाचा लिलाव भोवला; उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; आयोगाची कारवाई

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच व उपसरपंच पदाची बोली लावल्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करुन दणका दिला. त्याच बरोबर नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक देखील रद्द करण्यात आली आहे. Umrane Election Cancelled Nashik

वरील दोन्ही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. उमराणे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी तब्बल अडीच कोटीची बोली लावण्यात आली होती.

यासर्व प्रकरणाची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. या प्रकरणी आयोगाने जिल्हाप्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते. प्रातांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यात अडीच कोटींना बोली लावल्याचे निष्पन्न झाले. हा अहवाल जिल्हाप्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठविला.

जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल व विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. – यु.पी.एस. मदान, राज्य निवडणूक आयुक्त Sarpanch post auction Umrane Gram Panchayat elections cancelled or on hold Election Commission action nashik district

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.