संजीवनी ने तैवानमध्ये ताईपे येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक;जिंकणारी ठरली दुसरी भारतीय

भोसलाची  अांतरराष्ट्रीय विजयाची पंरपरा: संजीवनी जाधव तैवानमध्ये ताईपे येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

स्पर्धेत पदक जिंकणारी ठरली दुसरी भारतीय

नाशिक : महिनाभरापूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या बाविसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला कास्यपदक मिळवून देणाऱ्या संजीवनी जाधवचे पुन्हा अांतरराष्ट्रीय विजयाची पंरपरा राखली आहे. तैवानमध्ये ताईपे येथे झालेल्या जगातिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.तिने यावेळी स्वतःची सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे आहे ३३ मिनिटे २२ सेकंद. प्रथम क्रमांक आणि तिच्यातील अंतर ३ सेकंदाहून कमी आहे.

या अगोदर आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या कलिंगा स्टेडियमवर २२ व्या आशियाई स्पर्धेत संजीवनी जाधवने भोसलाचे आणि नाशिकचे नाव मोठे केले.नाशिकची पताका फडकविणाऱ्या संजीवनी जाधवने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संजीवनी जाधवने गुंटूर येथे संपलेल्या ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

कुस्तीसारखा रांगडा खेळ सोडून वळालेली संजीवनी आशियाई युवा, ज्युनिअर, विश्‍व शालेय, विश्‍व विद्यापीठ असा प्रवास करीत ती एका टप्यावर पोचली आहे. ती कविता राऊत, मोनिका आथरे  या नाशिककर धावपटूंची परंपरा पुढे नेत आहे. भोसला मिलिटरी कॉलेजची क्रीडा विभागाची  अांतरराष्ट्रीय विजयाची पंरपरा या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. भोसलाकडे क्रीडाक्षेत्राची उत्कृष्ट संस्कृती आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या अनेक खेळाडू तयार केले आहेत. खेळांच्या स्पर्धेतील भोसला मिलिटरी स्कूलचा आणि कॉलेजचा सहभाग हा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय चांगला राहिला आहे.

भारत सरकारच्या साईचे केंद्र भोसलात असून प्रशिक्षक विजेन्द्रसिंह ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी खेळाडूंची फळी तयार झाली आहे. भोसला व्यवस्थापन यासाठी अधिक सकारत्मक राहिले आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत ऑलिंपिक पात्रततेचे उद्दिष्ट संजीवनी समोर आहे. जितक्‍या अधिक स्पर्धेत ती सहभागी होईल, तितका तिचा आत्मविश्‍वास बळावणार आहे. तिच्या रूपाने महाराष्ट्राच्या खेळाडूंना नव संजीवनी नक्की मिळाली आहे. या विजयानंतर सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर,  यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.