इंजिनीरिंग महाविद्यालयांत क्रिकेट स्पर्धा : संदीप फाउंडेशन विजयी तर आर.एच. सपट उपविजेते

गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनीरिंग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात सांगता

नाशिंक : गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या क्रीडांगणावर संदीप फाउंडेशन आणि यजमान आर. एच सपट इंजिनीरिंग संघ यांच्यात झालेल्या २० – २० षटकांच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना यजमान संघाने १२७ धावांचे आव्हान संदीप फाउंडेशन संघासमोर उभे केले. मात्र संदीप फाउंडेशनच्या फलंदाजांनी प्रथमपासून जोमाने फलंदाजी करून चांगले प्रत्युत्तर देत केवळ ५ गडी गमावत १९.३ षटकांत १२९ धावा करत तीन चेंडू राखून हा अंतिम सामना जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यजमान आर. एच.सपट संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. sandip faundation won verses rh sapat engineering college cricket matches nashik

गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या आर. एच.सपट इंजिनीरिंग महिविद्यालयाच्या वतीने गेल्या ७  वर्षांपासून अंतर इंजिनीरिंग महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले जात आहे.  नाशिक जिल्हातील इंजिनीरिंग महाविद्यालयाच्या केवळ आठ नामांकित संघांमध्ये या स्पर्धा खेळविल्या जातात.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गोखले एज्यूकेशन सोसायटीला  १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे  या स्पर्धेला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. दिनांक १७ जानेवारीला स्पर्धेला सुरवात झाली. या स्पर्धेच्या विजेत्यां आणि उपविजेत्या संघांना प्रमुख पाहुणे गोखले एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस शिक्षण महर्षी डॉ. एम. एस गोसावी यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी खेळाडू अमित पाटील, जी. ई. सोसाटीचे एस्टेब्लिशमेंट मॅनेजर शैलेश गोसावी, जी. ई. सोसाटीचे शाखा सचिव डॉ. आर. पी.देशपांडे, इंजिनीरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. सी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्तीत होते. sandip faundation won verses rh sapat engineering college cricket matches nashik

या प्रसंगी विजेत्या आणि उपविजेत्या संघाबरोबर मॅन ऑफ सिरीजचा किताब अभिषेख मुखर्जी (संदीप फाउंडेशन) तसेच या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून वेदांत पाटील (आर. एच.सपट इंजिनीरिंग) याला, तर उत्कृष्ट  गोलंदाज  म्हणून भावेश खाळसे (संदीप फौंडेशन)  तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणेश वाघ (आर. एच. सपट इंजिनीरिंग) या तीन खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

या वेळी बोलतांना प्रमुख पाहुणे डॉ. एम. एस गोसावी यांनी सांगितले की खेळ आणि अभ्यास याचा समन्वय साधण्याचा गोखले संस्थेचा उद्देश चंगल्या प्रकारे साध्य होत आहे हेच या स्पर्धेच्या भरघोष सहभागामुळे दिसुन येते असे सांगून विजेत्यां खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी अमित पाटील यानेही आपल्या वाटचालीमध्ये या संस्थेचा फार मोठा वाटा आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यास यामध्ये समन्वय साधून प्रगती करावी असे आवाहन केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या महाविद्यालयाचे  प्रा. गोकुळ काळे, प्रा. अजित शिराळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगले परिश्रम घेतले.

असा आहे स्पर्धेचा निकाल : sandip foundation won verses rhsapat engineering college cricket matches nashik

विजेता संघ –  संदीप फाउंडेशन संघ

उप विजेता संघ – आर. एच. सपट इजिनीरिंग संघ

उत्कृष्ट कामगारी करणारे खेळाडू 

१) मॅन ऑफ सिरीज – अभिषेख मुखर्जी (संदीप फाउंडेशन)

२) उत्कृष्ट फलंदाज –  वेदांत पाटील (आर. एच.सपट इंजिनीरिंग)

३)  उत्कृष्ट  गोलंदाज -भावेश खाळसे (संदीप फाउंडेशन)

४) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – गणेश वाघ (आर. एच. सपट इंजिनीरिंग)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.