समृद्धी महामार्ग : शेतकऱ्यांचे समाधान झाल्याशिवाय निर्णय नाही – मुख्यमंत्री

समृद्धी बाबत शेतकऱ्यांचं समाधान झाल्या शिवाय निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री

नाशिक : samruddhi mahamarg समृद्धी महामार्गाला विरोध होतोय मात्र ८० टक्के ठिकाणी या महामार्गाला पाठींबा दिला असून. यावर होत असलेल्या विरोधाला चर्चा करणार असून, समृद्धी बाबत शेतकऱ्यांचं समाधान झाल्या शिवाय निर्णय घेणार नाही असे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

बहुतेक सर्व शेतकरी वर्गाला हा समृद्धी महामार्गाला हवा आहे. सर्वांची त्याला मंजुरी आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग होणार आहे. जो विरोध आहे तो चर्चेतून सोडवू असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मोजणी झाल्याशिवाय कसं कळणार शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय सगळे नेते एकाच गावात जातायत तिथली खरी परिस्थिती बघणं गरजेचं आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.