नाशिक जिल्हा जात प्रमणाणपत्र पडताळणी समितीला ‘आयएसओ’ नामांकन

आयएसओप्राप्त राज्यातील दुसरी समिती व विभागात प्रथम

नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांनी गेल्या सहा माहिन्यापासून आपला प्रशासकीय कारभार अधिक पारदर्शक व ऑनलाईन करत सर्वसामान्य जनतेला अधिक तत्पर व वेगवान सेवा दिली आहे. या जनताभिमुख सेवेचा सन्मान म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक ला ‘आयएसओ’ नामांकनाने गौरविण्यात आले आहे. ‘आयएसओ’ नामांकन प्राप्त करणारी नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा राज्यात 2 क्रमांक लागला आहे. तर नाशिक विभागात पहिला क्रमांक आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेचे महासंचालक श्री.कैलास कणसे (भापोसे) यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री.प्रकाश पाटोळे, उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे व संशोधन अधिकारी श्री.राकेश पाटील यांना आयएसओ प्रमाणपत्र यांना देऊन गौरविण्यात आले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने गेल्या 6 महिन्यात धडक मोहीम राबवित हजारो प्रकरणे निकाली काढली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपले कामकाज वेगवान व जलद करत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विविध वृत्तपत्रात जाहिरात देऊन कॅम्प घेतले. तसेच त्रुटी पूर्तता करण्याबाबत 3075 दूरध्वनी लघुसंदेश पाठविण्यात आले व त्रुटी पूर्तता कॅम्पमध्ये 2158 त्रुटींची पुर्तता करुन त्रुटी जमा करुन घेण्यात आले. वेळेत अर्जदारांना वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

ऑनलाईन सुविधा.

सध्या मा.महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे नियंत्रणाखाली समितीचे कामकाज चालते. त्यामुळे http://barti.maharashtra.gov.in या वेबसाईटचा वापर करुन CCVIS या लिंकवर क्लिक केल्यावर ऑनलाईन फॉर्म भरुन हमीपत्रासह त्याची प्रत संबंधित जिल्हा समिती कार्यालयात सादर करावे लागतात. अर्जदाराचा अर्ज नागरी सुविधा केंद्रात (CFC) सादर केल्यानंतर अर्जदारास सांकेतांक क्रमांक दिला जातो व सांकेतांक क्रमांकानुसार अर्जदाराचे प्रकरण कोणत्या स्तरावर आहे याबाबत अर्जदारास माहिती मिळू शकते. तसेच प्रकरण अर्जदाराने दाखल केल्यानंतर त्यावर टिपण्णी तयार केली जाते.  त्यानंतर 50 प्रकरणांचा एक लॉट करुन संबंधित शाखा प्रमुखांकडे पाठविण्यात येतात.  प्रत्येक प्रकरणाची बारकाईने तपासणी करून प्रकरण तीनही सदस्यांच्या समितीपुढे सादर करण्यात येतात. त्यानंतर समितीने वैध ठरविलेल्या प्रकणांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार करून रजिस्टर पोस्टाने अर्जदारास घरपोच पाठविण्यात येतात.

आय.एस.ओ. प्रमाणक देतांना जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांमधील गुणवत्ता पूर्ण सेवा, उच्च दर्जाच्या भौतिक सोयी-सुविधा, सदर संस्थेचे अद्यावत रेकॉर्ड, कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे शिस्तबध्द वर्तन, प्रशिक्षण, ज्ञान व कौशल, संस्थेंत उपलब्ध असलेल्या डिजिटल सुविधा, परिसराची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे आरोग्य या सारख्या असंख्य बाबींची काटेकोरपणे छाननी केली जाते. त्यानंतर अपेक्षित गुणांकन प्राप्त संस्थेला आय.एस.ओ.प्रमाणकन दिले जाते. या सर्व कसोटीवर नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यशस्वी ठरली आहे.

काय आहे आय.एस.ओ ?

आय.एस.ओ म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रमाण संघटना (International Standards Organization) ही एक संघटना असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना लागू होतील अशी प्रमाणके (Standards) तयार करण्याचे कार्य करते. ही संघटना मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून गुणवत्ता, कामाचा दर्जा,मालाची प्रतवारी इ.बाबींच्या अनुषंगाने चार प्रकारची प्रमाणपत्रे देते ही चार प्रमाणपत्रांच्या मालिकेत 9000, 9001, 9004, 19011 यापैकी 9001 हे प्रमाणपत्र गुणवत्तेशी संबंधित आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला 9001 हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.अशी माहिती श्रीमती वंदना कोचुरे यांनी दिली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.