हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांना मानवंदना (फोटो फिचर)

भावूक वातावरणात पार्थीव  गावाकडे रवाना नाशिक : आपल्या देशातील असलेल्या जम्मू-काश्मिरच्या हाजीन सेक्टरपरिसरात  अतिरेक्यांशी चकमकीत  भारतीय वायू दलाच्या विशेष गरूड कमांडो पथकाचे जवान महाराष्टचे सुपुत्र मिलिंद खैरनार यांना वीरमरण आले आहे. यामध्ये त्यांचे पार्थिव नाशिकच्या ओझर येथे  ‘एचएएल’ विमानतळावर आणले होते. त्यांचे पार्थीव  चंदीगढ वायुसेनेच्या विशेष विमानाने येथे आणले आहे.

 याच वेळी वायू सेनेच्या ने जवानांच्या तुकडीने त्यांना  लष्करी इतमामात मानवंदना दिली आहे.  यावेळी  जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले आहे. नाशिकला विमानाने कमांडो मिलिंद यांचे पार्थिव  आणले गेले त्या विमानात वीरपत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, मुलगा कृष्णा  होते. आज  विमानतळावरून सकाळी दहा वाजता नंदूरबार जिल्ह्यातील बोराळे गावाच्या दिशेने लष्करी वाहन कमांडो मिलिंद यांचे पार्थिव घेऊन निघाले. यामध्ये आज नाशिक करांनी त्यांना मानवंदना देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जबरदस्त गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव नाशिक हुन नंदुरबार येथे लष्करी ताफ्यात घेवून निघाले होते. नागरिकांनी अमर रहे सार्जंट मिलिंद अमर रहे, भारत माता की जय, अश्या घोषणा दिली तर नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहता यावी म्हणून लष्करी ताफा अडवला होता. जवळपास ३० मिनिटे नागरिक त्यांच्या सोबत निघाले होते. त्यामुळे वातवरण एकदम भावूक झाले होते.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.