Saloon Shops Covid19 Maharashtra केंद्राने सूचना दिल्यास सलून व्यवसायास परवानगी – भुजबळ

नाशिक दि.१३ जून :- कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलून शॉप सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगीतले. यावेळी आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थित होते. Saloon Shops Covid19 Maharashtra

राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यवसायिकांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यावसायिकांच्या प्रशाबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.

संत सेना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड शासकीय स्तरावर मागील तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. त्याचअनुषंगाने अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठक आयोजित केली होती.

यावेळी इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आप्पा सूर्यवंशी, प्रदेश विशेष निमंत्रीत नारायण यादव, जिल्हा अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, महानगरप्रमुख अरुण सैदाने, संतसेना फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गायकवाड,.रमेश आहेर, नाना वाघ, संतोष वाघ, ज्ञानेश्वर बोराडे, गणपत सोनवणे, विनोद गरुड उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपने बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला असून कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत नाभिक समाज नैराश्याग्रस्त असून काही व्यावसायिकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून व पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. Saloon Shops Covid19 Maharashtra

Follow Us On Facebook, Instagram, Twitter for coronavirus daily reports and statistics.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.