राष्ट्रीय युथ बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकच्या साक्षीचा ‘गोल्डन पंच’; एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड

नाशिक : अकोला क्रीडा प्रबोधनीची साक्षी उमेश गायधनी या मुष्टीयोद्धाने दमदार खेळ करत युथ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले. ८१ किलो वजनी गटात तिने ही कामगिरी केली आहे. sakshi gaidhani gold medal youth national akola krida prabodhini

हरियाणातील रोहतक येथे २४ ते ३० मार्च या कालावधीत युथ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत साक्षीने ८१ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावली आहे. या विजयासोबतच साक्षीने युथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धापूर्व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरामध्ये आपली जागा पक्की केली आहे.

साक्षी नाशिकचे प्रथम महापौर कै. शांताराम बापू वावरे व माजी आमदार कै. निवृत्ती भिकाजी गायधनी यांची नात आहे.

साक्षीने याच वर्षी कजाकिस्थान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आणि अकोल्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. राज्य क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा प्रबोधनीचे प्राचार्य सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात साक्षीने प्रशिक्षण घेतले आहे. sakshi gaidhani gold medal youth national akola krida prabodhini

महाराष्ट्र संघासोबत राकेश यादव, श्रीकृष्ण आजगावकर, मिलिंद पवार, शिल्पा गायधनी आदी खेळाडू गेले होते. साक्षीच्या या यशाचे क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोयल, उपसंचालक आनंद व्यंकटेश्वर, सुधीर मोरे, अमरावती विभागाचे उपसंचालक प्रतिभा देशमुख, महाराष्ट्र बॉक्सिंग असोशिएशनचे अध्यक्ष जय कोहली, सचिव भारत कुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डे, जिल्हाक्रीडाधिकारी गणेश कुलकर्णी, श्याम देशपांडे बॉक्सिंग असोशिएशनचे विजय शर्मा यांनी कौतुक केले.

युथ एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड

या दमदार विजयासोबतच साक्षी गायधनीची निवड  बँकॉक (थायलंड) येथे सुरु होणाऱ्या युथ एशियन चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २८ एप्रिल या कालावधीत होणार आहे . यास्पर्धेतूनही तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. – सतीशचंद्र भट्ट , राज्य प्रशिक्षक, क्रीडा प्रबोधिनी अकोला

युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघातर्फे साक्षी गायधनीने उत्कृष्ठ प्रदर्शन करत देशात महाराष्ट्राचे विशेषतः अकोल्याचे नाव मोठे केले. आगामी काळात बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी साक्षीची निवड झाली आहे. या स्पर्धेतही साक्षी उत्कृष्ठ खेळ करेल, अशी अपेक्षा आहे. साक्षीचे पालक उमेश गायधनी, पळसे, नाशिक

sakshi gaidhani gold medal youth national akola krida prabodhini

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.